आठवणीत रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

आठवणीत रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

पुसेगाव : रंगीबेरंगी रांगोळ्या, सुशोभित स्वागतकमानी, दिमाखदार फ्लेक्स यांनी सजलेल्या शाळेच्या प्रांगणात तब्बल 25 वर्षांनी सर्व वर्गमित्र-मैत्रिणी भेटले, सर्वांचे चेहरे हरखून गेले आणि ज्यांनी आयुष्यात घडवलं संस्कार केले त्या गुरुवर्यांच्या आशीर्वादामुळे सर्वजण समाधान झाले. हे सुवर्णक्षण आहे श्री शिवाजी विद्यालय डिस्कळमधील माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे.
         श्री शिवाजी विद्यालय, डिस्कळ (ता. खटाव) या शाळेतील  इयत्ता दहावी  1998-99 या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा दिनांक 19 मे 2024 रोजी आनंदात पार पडला. स्नेह मेळाव्यास जवळपास 54 माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी शाळेच्या माजी व आजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना आमंत्रित करण्यात आले होते. 
          कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी शिक्षकांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमामध्ये राष्ट्रगीत, प्रार्थना व स्वपरिचय झाल्यानंतर सर्व शिक्षकांना 'कृतज्ञता सन्मान चिन्ह' देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी काही विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. मेळाव्यास श्री आवळे सर, लावंड सर व श्री फडतरे सर यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना श्री फडतरे सर म्हणाले, " आपण किती संपत्ती जमा केली यापेक्षा आपण किती माणसं जोडली हे फार महत्त्वाच आहे, आपली ओंजळ भरल्यानंतर त्यातील काही वाटा समाजासाठी द्यायला हवा." या बॅचच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या नूतनीकरणाच्या कामात संपूर्ण लोढ्याचे काम करून शाळेप्रती आपले कर्तव्य बजावण्याचे काम केले.
       सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गात बसून जुन्या आठवणींना उजाळा दिला. सर्व विद्यार्थ्यांसाठी स्मरणचिन्ह भेटवस्तू म्हणून तयार करण्यात आले होते त्याचे वितरण करण्यात आले. आपल्या जुन्या मित्र-मैत्रिणींना व शिक्षकांना भेटून सर्वजण खूप आनंदी झाले आणि सर्व सोहळा आनंदात पार पडला.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला