छ.शाहु महाराजांचा वारसा बाबासाहेबांनी यशस्वीपणे चालविला : प्रा.विक्रम कदम

सातारा : आरक्षणाचे जनक छ. शाहु महाराजांनी दूरदृष्टीने सर्व क्षेत्रातील केलेले कार्य अजरामर ठरले आहे.त्यांचाच वारसा पुढे बाबासाहेबांनी यशस्वीपणे चालविला.असे प्रतिपादन प्रा. विक्रम कदम यांनी केले.
      येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे छ. शाहु महाराज यांच्या १०१ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजीत केलेल्या कार्यक्रमात, "राजर्षी शाहु महाराज आणि त्यांचे समग्र विचार" या विषयांवर प्रा.विक्रम कदम मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत होते.प्रा.कदम म्हणाले, "रयतेनी राजर्षी शाहु महाराजाना लोकराजा ही पदवी दिली होती. छ.शाहु महाराज २० व्या वर्षीच राजे झाले होते.फक्त ४८ वर्षे जगले असले तरी न भूतो न भविष्यती असा राज्यकारभार करून दाखवला.छ.शिवराय यांच्यानंतर छ.शाहू महाराज यांनी लोकाभिमुख कारभार केला होता.त्यांनी सर्व समाज घटकांना न्याय दिला.परिस स्पर्श पेक्षाही शाहु स्पर्श ज्यांना ज्यांना झाला. त्यांनी त्यागीवृत्तीने आधुनिक भारत घडवला.त्यातील कोहिनुर हिरा म्हणून बाबासाहेब होत.त्यांनी संविधानाच्या माध्यमातून जगतालाच दिपवून टाकले.पहिल्या अस्पृश्य परिषदेत बाबासाहेब दलितांचे पुढारी असून त्यांच्या ज्ञानाचा उपयोग देशवासीयांना होईल.असे स्पष्ट संदेश लोकराजांनी दिले होते. बाबासाहेबांना म्हणाले होते, आम्ही परंपरेचे राजे असलो तरी तुम्ही ज्ञानाचे राजे आहात.शाहु महाराजांची तिन्हीही मुले बाबासाहेबांना मामा म्हणत होते. यावरूनच त्यांचा ऋणानुबंध जिव्हाळ्याचा असल्याचे स्पष्ट होत आहे.छ.शाहूंनी कोल्हापूरसह राज्यभर दौरे काढुन ठिकठिकाणी २३ बोर्डिंगची निर्मिती केली.त्यांनीच शिक्षणाची गंगोत्री तळागाळात पोहचविण्याची कामगिरी केली. सत्यशोधक चहा टपरी,चोऱ्या करणाऱ्यानाही काम दिले.पारधी समाजतील व्यक्तींना पहारेदार - चौकीदार केले.असे अनेक उपक्रम राबवून माणसाला माणसात आणले.नाहीतर आताचे चौकीदारच आहेतच."अशा पद्धतीने प्रा.कदम यांनी विविध उदाहरणांच्या सहाय्याने अभ्यासपूर्ण माहिती देऊन श्रोता वर्गास मंत्रमुग्ध केले.
    अध्यक्षस्थानावरून बोलताना समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत म्हणाले,"जिल्ह्याच्या मातीत महापुरुष यांनी आधुनिक समाज जागृतीची ज्योत पेटवली असल्याने तिचा सुगंध सर्वत्र पसरत आहे. तेव्हा मातीतील ऋण फेडण्यासाठी परिवर्तन चळवतील जनमुदायानी स्वस्थ न बसता सातत्याने कार्यरत राहिले पाहिजे."
      प्रथमतः प्रा.कदम यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व राजर्षी शाहु महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.प्रा.कदम यांचा सन्मानिका व पुष्पगुच्छ देऊन खंडाईत आप्पा यांनी सत्कार केला. याशिवाय, मंचावरील मान्यवरांचाही यथोचित असा सत्कार करण्यात आला.१०० सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजास अभिवादन करण्यात आले.ऍड. हौसेराव धुमाळ यांनी प्रास्ताविक केले. अनिल वीर यांनी पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन केले.ऍड.प्रा.विलास वहागावकर यांनी आभारप्रदर्शन केले.यावेळी ओबीसी जिल्हाध्यक्ष भरत लोकरे,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीताताई लोहार, रमेश इंजे,माणिक आढाव, दादासाहेब केंगार,डॉ. विलास खंडाईत,प्रताप कदम, सुदर्शन इंगळे,धम्मचारी संघादित्य संजय परदेशी,विजय गायकवाड, अमर गायकवाड, महेंद्र भोसले, शामराव बनसोडे, बी.एल.माने, पी.टी. कांबळे,अमोल बनसोडे, आदिनाथ बिराजे,संजय नितनवरे,शाहिर प्रकाश फरांदे, मिलिंद कांबळे, योगेश मस्के, किरण कांबळे, विशाल कांबळे, शिवनाथ जावळे, अरुण जावळे, श्रीरंग वाघमारे, सुनील निकाळजे, यशपाल बनसोडे,डी.एस.भोसले, रामचंद्र गायकवाड,रमेश जाधव, डॉ.आदिनाथ माळगे,एन डी.कांबळे,कोरे सर,जाधव,आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी,पदाधिकारी,उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला