सातारा मतदारसंघातून अतुल भोसलेंनी खासदार व्हावं : जयकुमार गोरे
Satara News Team
- Thu 8th Feb 2024 04:21 pm
- बातमी शेयर करा
कराड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुचर्चित सातारा लोकसभा मतदारसंघ भाजप अथवा महायुतीतील अजित पवार गटाच्या वाट्याला जाणार याबाबतची संभ्रमावस्था कायम आहे. या लोकसभा मतदारसंघातून राज्यसभेवर प्रतिनिधित्व करणारे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असतानाच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी कराड तालुक्यातील वाठारमधील एका जाहीर सभेत केलेल्या वक्तव्यामुळे उमेदवारीवरून तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
कराड दक्षिण मधील भाजपाचे नेते व सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार व्हावं ही आम्हा सर्वांची भावना आहे. मात्र ते लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत. ते कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी अनेकांना संधी दिली, असे म्हणत आता विकासाभिमुख नेतृत्व असलेल्या अतुल भोसले यांना संधी द्या. खरंतर अतुल भोसले यांनी खासदार व्हावं, अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. मी उमेदवारी देणारा अथवा उमेदवारी जाहीर करणारा पदाधिकारी नाही. ते अधिकार दिल्लीत वरिष्ठांना आहेत. मात्र अतुल भोसले यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास होकार दिल्यास काहीच अडचण येणार नाही, असे जाहीर वक्तव्य आमदार जयकुमार गोरे यांनी वाठार येथील जाहीर सभेत केले.
आमदार जयकुमार गोरे यांच्या या वक्तव्यानंतर सातारा लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार कोण असणार? वरिष्ठ नेत्यांचं जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांची भावना लक्षात घेत लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत इच्छुक नसणारे डॉक्टर अतुल भोसले लोकसभा निवडणूक रिंगणात उतरण्यास होकार देणार का? अशा अनेक चर्चा आता यामुळे सुरू झाल्या आहेत
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 8th Feb 2024 04:21 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 8th Feb 2024 04:21 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Thu 8th Feb 2024 04:21 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 8th Feb 2024 04:21 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 8th Feb 2024 04:21 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 8th Feb 2024 04:21 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 8th Feb 2024 04:21 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 8th Feb 2024 04:21 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 8th Feb 2024 04:21 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 8th Feb 2024 04:21 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 8th Feb 2024 04:21 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 8th Feb 2024 04:21 pm













