किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर मौजे गाढवेवाडी येथे संपन्न
विद्यार्थ्याचे मन आणि मनगट भक्कम होण्यासाठी श्रमसंस्कार शिबीर महत्वाची भूमिका बजावते – श्री. नारायण घोलप
बापू वाघ- Tue 27th Dec 2022 03:54 pm
- बातमी शेयर करा
गाढवेवाडी : ‘विद्यार्थ्याचे मन आणि मनगट भक्कम होण्यासाठी श्रमसंस्कार शिबीर महत्वाची भूमिका बजावते. युवा पिढीला ग्रामीण जीवनाचा जवळून परिचय शिबीरातून होतो. श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे हेच या उपक्रमाचे मूळ उद्दिष्ट आहे’. असे उदगार वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. नारायण घोलप यांनी गाढवेवाडी येथे काढले.
मौजे गाढवेवाडी ता. वाई येथे किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयातील ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराच्या समारोप समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. जनता शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री. सुरेश यादव हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर संस्थेचे खजिनदार प्रा. नारायण चौधरी, प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे, उपप्राचार्य श्री. राजेंद्र शिंदे, पर्यवेक्षक श्री. विवेक सुपेकर, गाढवेवाडी गावचे सरपंच श्री. सुनील मांढरे, उपसरपंच सौ. संगिता गाढवे, पोलिस पाटील सौ. निताली पाटणे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. नारायण घोलप मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, ‘मोबाईलच्या अति वापरामुळे घराघरातील सुसंवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे समाजसेवा, आरोग्य संवर्धन, देशप्रेम, ध्येयनिश्चिती, उत्तम चारित्र्याचे जतन इत्यादी नैतिक मूल्ये जोपासण्याचे संस्कार कुटुंब आणि समाजातून लाभत नाहीत. त्यामुळे आत्मकेंद्री बनलेले युवक चंगळवादाकडे धावत आहेत. अशावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबीर हे दीपस्तंभासारखे कार्य करीत आहे. स्वयंसेवकांनी हा श्रमाच्या प्रतिष्ठेचा वारसा सर्व समाजापर्यंत पोहचविला पाहिजे.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री. सुरेश यादव म्हणाले की, ‘शिबीरामध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवलेले हे सात दिवस हा त्यांच्या जीवनातील सुवर्णकाळ आहे. शिबीरातील आठवणी आयुष्यभर काळजावर कोरल्याप्रमाणे लक्षात राहतात. त्यांना सामाजिक समरसतेची जाणीव होते. ग्रामीण संस्कृतीचा संपूर्ण परिचय या शिबीरामधून होत असतो. या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून हे तरूण नक्कीच भावी जीवनात उत्तम समाज कार्य करतील असा विश्वास वाटतो.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, सरपंच श्री. सुनील मांढरे, यांची विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी भाषणे झाली. तसेच ग्रामस्थांच्या वतीने सौ. मनिषा चिकणे श्री. अशोकराव गाढवे, श्री. मिलिंद गाढवे यांनी तर विद्यार्थ्यांच्या वतीने कु. आदिती भोसले व तेजस शेलार यांनी मनोगते व्यक्त केली.
ग्रामस्थांच्या वतीने व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच कार्यक्रम अधिकारी, शिबीर सहायक शिक्षक, आदर्श विद्यार्थी, आदर्श स्वयंसेवक पुरस्कार हर्षद ओंबळे व श्रृती पवार या विद्यार्थ्यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामस्थ विकास पाटणे, प्रभाकर जाधव, पांडुरंग भिलारे, दत्तात्रय पाटणे, रविंद्र भिलारे, भरत चिकणे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रकल्प अधिकारी श्रावण पवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. बाळासाहेब कोकरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. गौरी पोरे व नयना भोसले यांनी सूत्रसंचालन केले. तर गणेश चव्हाण यांनी आभार मानले.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Tue 27th Dec 2022 03:54 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 27th Dec 2022 03:54 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 27th Dec 2022 03:54 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Tue 27th Dec 2022 03:54 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Tue 27th Dec 2022 03:54 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Tue 27th Dec 2022 03:54 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 27th Dec 2022 03:54 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 27th Dec 2022 03:54 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 27th Dec 2022 03:54 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 27th Dec 2022 03:54 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 27th Dec 2022 03:54 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 27th Dec 2022 03:54 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 27th Dec 2022 03:54 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 27th Dec 2022 03:54 pm













