अदानी ग्रीन एनर्जी प्रोजेक्टला तारळे विभागातील 102 गावांनी आपला कडाडून विरोध. काम बंद

पाटण :  पाटण तालुक्यातील तारळे धरणावर कळंबे येथे होऊ घातलेल्या अदानी ग्रीन एनर्जी प्रोजेक्टला तारळे विभागातील 102 गावांनी आपला कडाडून विरोध कायम ठेवला आहे. हा प्रोजेक्ट कोणत्याही परिस्थितीत होवू न देण्यासाठी 102 गावातील नागरिकांनी एकत्रित येत या प्रकल्पाविरोधात आंदोलनाची भूमिका घेत प्रकल्पाचे काम काल बंद पाडले.

ज्यावेळी पर्यावरणीय जनसुनावणीची जाहीर नोटीस प्रसिद्ध झाली, त्यावेळी स्थानिकांना याबाबत माहिती झाली. त्यानंतर संपूर्ण माहिती घेऊन मार्चमध्ये झालेल्या जनसुनावणीला स्थानिकांनी प्रखर विरोध केला. तेव्हापासून प्रोजेक्टच्या विरोधात तारळे खोऱ्यात चळवळ उभी राहिली आहे. प्रोजेक्टच्या विरोधात प्रोजेक्ट विरोधी कृती समिती स्थापन झाली असून, त्यांनी तीव्र लढा सुरू केला आहे. वास्तविक, असे काम करत असताना अदानी कंपनीकडे जर अधिकृतपणे टेस्टिंग करायला परवानगी असेल, तर ती कागदपत्रे साइटवर उपलब्ध असायलाच हवी.

त्याशिवाय त्यांनी त्या कंपनीला दिलेली वर्कऑर्डरसुद्धा उपलब्ध असायला हवी. त्याचबरोबर ज्या कंपनीची मशिन सुरू आहे, ते मशिन ऑपरेट करण्याचे लायसन्स आणि इतर सर्वच परवान्याची प्रत साइटवर उपलब्ध असायला हवी; परंतु असे काहीही तिथे उपलब्ध झाले नाही. संबंधित कंपनीच्या मुंबईतील व्यवस्थापकाशी बोलल्यावर या संपूर्ण कामाबद्दल ठोस माहिती दिली नाही, तसेच काहीही कागदपत्रे सुद्धा दाखविण्याची तयारी दिसून आली नाही. त्यामुळे आम्ही सर्वांनी संपूर्ण विभागाच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्या व्यवस्थापकाला काम बंद करणेस सांगितले व त्यांनीही वरील सर्व कागदपत्रे उपलब्ध नसल्याने आणि आपला स्थानिक म्हणून असलेला विरोध लक्षात घेऊन हे काम बंद केले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला