सुनेवर अत्याचार करणार्या सासर्यास पोलीस कोठडी
Satara News Team
- Thu 21st Dec 2023 10:18 am
- बातमी शेयर करा
नागठाणे : सातारा तालुक्यातील एका गावातील सुनेचा विनयभंग करत तिच्यावर अत्याचार करणार्या सासर्यास बोरगाव पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, विवाहितेच्या तक्रारीवरुन सासर्यासह तिचा पती, दीर, नणंदेवर देखील गुन्हा दाखल झाला असून या सर्वांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार विवाहितेला तिच्या पती, सासरा, दीर व नणंदने चांगला स्वयंपाक येत नाही, घरातील कामे नीट करता येत नाहीत या कारणावरुन वेळोवेळी घालून पाडून बोलणे, उपाशी ठेवणे तसेच मारहाण करणे असे प्रकार केलेले आहेत. तसेच सासू व सासर्यांना माहेरहून 2 लाख रुपये घेण्यासाठी शारीरीक व मानसिक छळ केला. तर हे सर्व सुरु असताना दि. 12 डिसेंबर 2023 रोजी सासर्यांनी विवाहितेसोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. त्यानंतर दि. 16 डिसेंबर रोजी सासू व सासर्यांनी शिवीगाळ करत गंभीर स्वरुपाची मारहाण केली आहे. तर दीराने तुझा नवरा वेडा आहे, त्याचेकडुन तुझे भागत नसेल तर तु माझ्यासोबत झोप मी तुला मुलगा देतो असे म्हणुन माझ्याकडे शारीरीक संबंधाची मागणी केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी पती, दीर, सासरा, सासू, नणंद यांच्यावर लेंगिक अत्याचार, विनयभग व मारहाणप्रकरणी गुन्ह दाखल केला आहे. दरम्यान, विवाहितेच्या सासर्यास अटक केली असून त्याला न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इतर संशयितांना अद्याप अटक झालेली नाही. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर करत आहेत.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 21st Dec 2023 10:18 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 21st Dec 2023 10:18 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 21st Dec 2023 10:18 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 21st Dec 2023 10:18 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 21st Dec 2023 10:18 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 21st Dec 2023 10:18 am
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Thu 21st Dec 2023 10:18 am
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 21st Dec 2023 10:18 am
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Thu 21st Dec 2023 10:18 am
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Thu 21st Dec 2023 10:18 am
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 21st Dec 2023 10:18 am
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Thu 21st Dec 2023 10:18 am
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Thu 21st Dec 2023 10:18 am











