सातारा सायबर पोलिसांची दमदार कामगिरी
गहाळ झालेले तब्बल १३ लाख रुपये किंमतीचे ८२ मोबाईल मूळ मालकांना परत
ओमकार सोनावले- Thu 28th Jul 2022 06:47 am
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा जिल्हयातील नागरीकांचे वापरणेत येणारे मोबाईल हे गहाळ होण्याचे प्रमाण वाढले होते. त्याबाबतचा मा. पोलीस अधीक्षक श्री अजयकुमार बन्सल यांनी सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचेकडून माहिती घेवून त्यांना आदेशीत केले की, सायबर पोलीस ठाणे मार्फत गहाळ झालेल्या मोबाईलची तसेच चोरीच्या गुन्हयात गेलेले मोबाईलची तात्रिक माहितीच्या आधारे शोध मोहिम राबवून जास्तीत जास्त मोबाईल नागरीकांना परत कसे करता येईल याबाबत सूचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक श्री. अजित बो-हाडे, पोलीस निरीक्षक सुनिल शेळके, सायबर पोलीस ठाणे सातारा यांनी सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार अजय जाधव, अमित झेंडे इ. अंमलदार यांचे पथक तयार करुन सातारा जिल्हयातून गहाळ झालेले मोबाईल शोधकामी नेमणेत आले होते. नमुद पथकांनी मागील एक महिण्यामध्ये तांत्रिक माहिती चे अत्यंत तंत्रशुध्द पध्दतीने विश्लेषण करुन अंदाजे १३,००,०००/- रु. किमतीचे ८२ मोबाईल शोधुन ते ताब्यात घेणेत सायबर पोलीस पथकास यश आले आहे.
आज दि.२८/०७/२०२२ रोजी ज्या नागरीकांचे मोबाईल मिळुन आले आहेत. त्या नागरीकांना मोबाईल हे त्यांचेकडील कागदपत्रांची ओळख पटवुन मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजित बो-हाडे, पोलीस निरीक्षक सुनिल शेळके. सायबर पोलीस ठाणे सातारा व सायबर पोलीस ठाणेचे तपास पथकातील सर्व अंमलदार यांचे उपस्थितीत मोबाईल देण्यात आले नागरीकांना त्याच्या हरवलेला मोबाईल मिळेल असे अपेक्षित नसताना पुन्हा मोबाईल मिळाल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले व तसेच मोबाईल मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहन्यावर दिसुन आला.
तसेच मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजित बोऱ्हाडे यांनी पथकाचे अभिनंदन करुन भविष्यात देखील सायबरच्या तांत्रिक विश्लेषणाच्या -आधारे जास्तीत जास्त मोबाईल नागरीकांना परत करण्याबाबत सुचना दिल्या असुन ही मोहीम भविष्यात देखील सतत राबविण्यात येणार आहेत. नमुद कामगिरीत सायबर पोलीस ठाणे सातारा कडील पोलीस निरीक्षक सुनिल शेळके, पोलीस अंमलदार अजय जाधव, अमित झेंडे, महेश शेटे, कर सावंत, सचिन पवार, संदिप पाटील, वर्षा खोचे, रेश्मा चव्हाण, यशोमती काकडे, ज्योती शिंदे, विण आहिरे, सुशांत कदम, महेश पवार, यशवंतराव घाडगे यांनी सहभाग घेतला आहे.
satarapolice
crime
cyber
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 28th Jul 2022 06:47 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 28th Jul 2022 06:47 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Thu 28th Jul 2022 06:47 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 28th Jul 2022 06:47 am
संबंधित बातम्या
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Thu 28th Jul 2022 06:47 am
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Thu 28th Jul 2022 06:47 am
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Thu 28th Jul 2022 06:47 am
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Thu 28th Jul 2022 06:47 am
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Thu 28th Jul 2022 06:47 am
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Thu 28th Jul 2022 06:47 am
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Thu 28th Jul 2022 06:47 am
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Thu 28th Jul 2022 06:47 am












