साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीत कामगार विभागाचा उपसंचालक 'लाचलुचपत'च्या जाळ्यात
Satara News Team
- Fri 8th Dec 2023 08:33 am
- बातमी शेयर करा
सातारा: औद्योगिक वसाहतीमधील दोन कंपन्यांच्या कामगारांची वैद्यकीय तपासणी केलेल्या बिलाची टक्केवारी म्हणून १७ हजारांची लाच घेताना कामगार विभागाचा उपसंचालक नंदकिशोर आबासाहेब देशमुख (वय ४५, रा. विंडवड्स सोसायटी, वाकड, पुणे) याला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता औद्योगिक वसाहतीत करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी, यातील तक्रारदार हे प्रमाणक शल्यचिकित्सक आहेत. त्यांनी एमआयडीसीमधील दोन कंपन्यांच्या कामगारांची वैद्यकीय तपासणी केली होती. त्याची बिले सातारा औद्योगिक वसाहतीमधील औद्योगिक सुरक्षा व कामगार विभाग कार्यालयात मंजुरीसाठी देण्यात आली होती. ५८ हजार ४०० रुपये बिलाच्या ३० टक्के प्रमाणे १७ हजार ५२० रुपयांची लाच उपसंचालक नंदकिशोर देशमुख याने मागितली. त्यानंतर तक्रारदार शल्यचिकित्सक यांनी लाचलुचपत कार्यालयात जाऊन रीतसर लेखी तक्रार केली. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी शहानिशा केली असता उपसंचालक लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. गुरुवारी सायंकाळी औद्योगिक वसाहतीमध्ये अधिकाऱ्यांनी सापळा लावला. या सापळ्यात उपसंचालक १७ हजारांची लाच घेताना रंगेहाथ सापडला. पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन राऊत, पोलिस नाईक गणेश ताटे, तुषार भोसले, नीलेश येवले यांनी या कारवाईत भाग घेतला.
स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Fri 8th Dec 2023 08:33 am
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Fri 8th Dec 2023 08:33 am
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Fri 8th Dec 2023 08:33 am
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Fri 8th Dec 2023 08:33 am
संबंधित बातम्या
-
ढेबेवाडीत मगर बंधू ज्वेलर्समध्ये चोरी; नऊ तोळे सोने लंपास!
- Fri 8th Dec 2023 08:33 am
-
महामार्गावर कवठे गावानजीक एक किलो सोने दरोडेखोरांनी लुटले
- Fri 8th Dec 2023 08:33 am
-
खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी तीन हजारांची लाच; मंडलाधिकारी रंगेहाथ जाळ्यात
- Fri 8th Dec 2023 08:33 am
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Fri 8th Dec 2023 08:33 am
-
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Fri 8th Dec 2023 08:33 am
-
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Fri 8th Dec 2023 08:33 am
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Fri 8th Dec 2023 08:33 am
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Fri 8th Dec 2023 08:33 am













