खंडाळा सेतू भ्रष्टाचाराबाबत "लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा" येथे तक्रार दाखल...
Satara News Team
- Fri 14th Jun 2024 05:31 pm
- बातमी शेयर करा
सातारा - खंडाळा तहसील कार्यालयातील सेतू अस्थापनेतील सेतू चालक मुकेश बाळू सपकाळ हा इसम तहसिल कार्यालयात सेतु विभागामध्ये कार्यरत असताना त्याने गेले दीड ते दोन वर्षांमध्ये लाखो रुपयांची अपसंपदा जमवली आहे.
सेतू ऑपरेटर मुकेश सपकाळ हा "नायब तहसिलदार, निवासी नायब तहसिलदार तहसिल कार्यालय खंडाळा व विद्या ऑनलाईन सर्विसेस प्रा.लि.पुणे यांचे तर्फे खंडाळा सेतू व्यवस्थापक विशाल गडगे" यांच्या वरदहस्ताने मुकेश सपकाळ यास तहसिल कार्यालयात सेतू अस्थापना विभागात चालक म्हणून नियुक्त केला असून या सर्वांच्या माध्यमातून तहसिल कार्यालयात शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांकडून प्रति दाखला ३३ रु पेक्षा जास्त अतिरिक्त शुल्क घेऊन तहसिल कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच विद्या ऑनलाईन सर्विसेस प्रा.लि.पुणे यांचे कमिशन पुरवून उरलेला पैश्यातून सदर सेतू ऑपरेटर हा अपसंपदा निर्माण करत आहे. तरी मुकेश सपकाळ हा अतिरिक्त शुल्क घेत असलेबाबत तहसिलदार खंडाळा, उपविभागीय अधिकारी वाई तसेच जिल्हाधिकारी सातारा यांचेकडे वारंवार तक्रारी दाखल होत असताना देखील त्याच्यावर कोणतीही निलंबनाची कारवाई करण्यात आली नसल्याने संबंधित भ्रष्ट कामकाजाबाबत थेट वरिष्ठांचा सहभाग असल्याचे निष्पन्न होत आहे. याचाच फायदा घेत मुकेश सपकाळ व त्याचे सहकारी यांनी दरमहा लाखो रुपयांच्या अतिरिक्त शुल्काच्या माध्यमातून भ्रष्टाचार सुरु केला आहे. याच भ्रष्टाचाराच्या पैशातून त्यांनी अमाप अपसंपदा जमवली आहे.
तरी संबंधित सेतू ऑपरेटर मुकेश सपकाळ व सदर सेतूची निविदा घेतलेली कंपनी विद्या ऑनलाईन सर्व्हिसेस प्रा.लि.पुणे यांचे व्यवस्थापक विशाल गडगे यांच्या अपसंपदेची सदर तक्रार अर्जाच्या अनुषंगाने मा. पोलीस उप-अधीक्षक सो. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी उचित कारवाई करावी असे सदर तक्रारी मध्ये म्हणले आहे. तरी सदर तक्रारीच्या अनुषंगाने सेतू ऑपरेटर मुकेश सपकाळ व संबंधित निविदा घेतलेली कंपनी विद्या ऑनलाईन सर्व्हिसेस पुणे यांचा ठेका रद्द करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होत आहे की नाही याच्याकडे खंडाळा तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधून आहे.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Fri 14th Jun 2024 05:31 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Fri 14th Jun 2024 05:31 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Fri 14th Jun 2024 05:31 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Fri 14th Jun 2024 05:31 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Fri 14th Jun 2024 05:31 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Fri 14th Jun 2024 05:31 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Fri 14th Jun 2024 05:31 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Fri 14th Jun 2024 05:31 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Fri 14th Jun 2024 05:31 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 14th Jun 2024 05:31 pm













