कृष्णा... उरमोडी खोऱ्यांचा बिहार झालाय का....?

देशमुखनगर : या महिन्यात 15 दिवसांपूर्वी अमावस्येच्या दरम्यान मध्यरात्री एका गावात अज्ञात पाच ते सहा जणांनी अमानुष मारहाण केल्यामुळे सोनापूर ता. सातारा येथील नागेश गोरख नावडकर याचा मृत्यू झाला. 
   मारहानीनंतर गणेश हा नऊ दिवस मृत्यूशी झुंज देत जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होता. या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली असल्याने कृष्णा उरमोडी संगमाच्या खोऱ्याचा बिहार झालाय का....? असा थेट सवाल लोक करू लागले आहेत. 
    याबाबत सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की गणेश याचे एका मुलीसोबत प्रेम संबंध होते दिनांक ९ रोजी रात्रीचा जागरण,  गोंधळाचा कार्यक्रम असल्याने त्या कार्यक्रमास संबंधित मुलीने गणेशला घरी बोलावले होते. त्याच दिवशी मध्यरात्री गणेश यास पाच ते सहा जणांनी दोरीने झाडास बांधून कातडी पट्याने, लाकडी दांडक्याने, अर्धनग्न करून अमाणुष मारहाण केली. हा अमाणुष प्रकार शब्दात सांगता येणार नाही असा केला होता. तब्बल नऊ दिवस मृत्यूची झुंज देत मारहाणीत अंतर्गत रक्तस्त्रावामुळे पोटात व छातीत दुखत असल्याने  जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान गणेशचा मृत्यू झाला. 
      या प्रकरणाचा गुन्हा बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला. यावेळी पोलिसांनी आजपर्यंत चार आरोपींना अटक केली असून, यामधील दोन विधीसंघर्ष मुलांची बालसुधारक गृहात रवानगी केली असून आणखी संशयित अद्याप फरार असल्याचे सूत्राने सांगितले. 
    मुलीशी प्रेम संबंधाचा संशयावरून घडलेल्या या मारहाण आणि मृत्यू प्रकरणात गणेश हा अमानुष्पणाचा बळी ठरला या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असल्याने कृष्णा उरमोडी संगमाच्या खोऱ्यांचा बिहार झालाय का...? असा सवाल लोक करून लागले आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला