कोणाला मिळणार गिफ्ट आणि कोणाचा ताण वाढणार? वाचा आजचे राशीभविष्य
Satara News Team
- Fri 11th Aug 2023 07:34 am
- बातमी शेयर करा
आजचे राशी भविष्य 11 ऑगस्ट 2023 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?
मेष : कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल. प्रगतीचा योग निर्माण होईल. व्यापारात चांगला लाभ होईल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत तयार होतील. दाम्पत्य जीवनात आनंद असेल. अचानक आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - जांभळा.
वृषभ : जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. अविवाहित असलेल्या तरुणांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. नवीन गाडी खरेदीचा विचार कराल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. आजचा शुभ रंग - नारंगी.
मिथुन : कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. नव्या कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. नव्या योजना सुरू करण्यासाठी वेळ देणे महत्त्वाचे आहे. कामे पूर्ण करण्यात जोडीदाराची चांगली साथ मिळेल. धनलाभाचा योग आहे. आजचा शुभ रंग - केशरी.
कर्क : कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले असेल. व्यापाऱ्यांना चांगला नफा होईल. नव्या योजनांची सुरूवात करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊन महत्त्वाचे निर्णय घ्या. विरोधकांपासून सावध रहा. आजचा शुभ रंग - पिवळा.
सिंह : आवडत्या व्यक्तीची दिवसभरात भेट होण्याची शक्यता आहे. नातेसंबंध अधिक घट्ट होतील. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचं नियोजन कराल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. आजचा शुभ रंग - पांढरा.
कन्या : एखाद्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवून गुंतवणूक करु नका. स्वत: अभ्यास करुन माहिती मिळवून गुंतवणूक करा. कामाचे चांगले फळ तुम्हाला नक्की मिळेल. दूरचा प्रवास होऊ शकतो. आजचा शुभ रंग - लाल.
तूळ : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला नफा प्राप्त होईल. आरोग्याची काळजी घ्या. बाहेरील खाद्य-पदार्थ खाणे टाळा. दिवसभरात आनंदाची बातमी मिळू शकते. व्यापाऱ्यांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आजचा शुभ रंग - पिवळा.
वृश्चिक : कुटुंबात एखादी चिंता सतावण्याची शक्यता आहे. संपत्ती खरेदीचा विचार कराल. सकारात्मक विचाराने कामाची सुरुवात करा यश मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - लाल.
धनु : सकारात्मक बातमी मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आरोग्याची काळजी घ्या. मित्र किंवा जोडीदारासोबत वेळ घालवाल. एखादे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकाळापासून रखडलेल्या कामात आणखी अडथळे येऊ शकतात. आजचा शुभ रंग - पिवळा.
मकर : आपल्या क्षेत्रात नेटवर्किंग आणि कनेक्टिव्हिटीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. जोडीदारासोबत वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. कामाचा ताण वाढेल. जबाबदारी वाढल्याने मानसिक ताण-तणाव जाणवेल. आजचा शुभ रंग - हिरवा.
कुंभ : प्रेमी जोडप्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आरोग्य सुदृढ राहील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत वाद घालू नका. संपत्तीची विक्री करण्याचा निर्णय घेऊ शकता. कुटुंबासोबत धार्मिकस्थळी भेट द्याल. आजचा शुभ रंग - पांढरा.
मीन : आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. वायफळ खर्च टाळा. एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार कराल. आजचा शुभ रंग - पिवळा.
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Fri 11th Aug 2023 07:34 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Fri 11th Aug 2023 07:34 am
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Fri 11th Aug 2023 07:34 am
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Fri 11th Aug 2023 07:34 am
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Fri 11th Aug 2023 07:34 am
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Fri 11th Aug 2023 07:34 am
संबंधित बातम्या
-
गुरुवारी { उद्या } पहाटे पूर्व आकाशात अनुभवता येणार शुक्र-मंगळ युतीचा नजारा
- Fri 11th Aug 2023 07:34 am
-
मैत्री एक नातं रक्तापलिकडचं....!
- Fri 11th Aug 2023 07:34 am
-
दहीहंडीचा दिवस तुमच्यासाठी कसा? वाचा आजचे राशीभविष्य
- Fri 11th Aug 2023 07:34 am
-
'या' राशींनी आज घ्या काळजी, असा आहे बुधवारचा दिवस
- Fri 11th Aug 2023 07:34 am
-
वृषभ, कन्या, मकर, मीन राशीच्या लोकांनी मंगळवारी या गोष्टी करू नयेत, जाणून घ्या कसा असेल दिव
- Fri 11th Aug 2023 07:34 am
-
2 September: 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, धनलाभ होईल
- Fri 11th Aug 2023 07:34 am
-
सप्टेंबर महिन्याची सुरुवात दमदार होणार, 'या' राशीच्या व्यक्तींना होणार लाभ
- Fri 11th Aug 2023 07:34 am
-
31 august: ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस तुमच्यासाठी कसा? वाचा राशीभविष्य
- Fri 11th Aug 2023 07:34 am













