शिवाजी विद्यापीठ नियतकालिक स्पर्धेत शिवविजय २०१९-२० ला १२ पारितोषिके
छत्रपती शिवाजी कॉलेज,विद्यापीठात द्वितीयSatara News Team
- Sun 30th Oct 2022 07:56 am
- बातमी शेयर करा
सातारा : शिवाजी विद्यापीठ सलग्न महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धा -२०१९-२० निकाल विद्यापीठाने जाहीर केला असून येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या शिवविजय या नियतकालिकातील विद्यार्थ्यांनी साहित्य,कला इत्यादी स्पर्धेत १२ पारितोषिके मिळविली. तसेच मांडणी,रचना, सुंदरता,छपाई इत्यादी निकषावर मूल्यमापन होऊन या शिवविजय अंकाने शिवाजी विद्यापीठात दुसरा क्रमांक मिळविला आहे.विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील व कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे यांनी शिवविजय २०२९-२० चे संपादक व छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्यांचे प्रतिनिधी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.
शिवाजी विद्यापीठ सलग्न महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेतील वैयक्तिक १२ पारितोषिके ज्यांना मिळाली आहेत.त्यात मराठी भाषेमध्ये समीक्षा लेखनप्रकारात पल्लवी वाघमळे हिने लीहिलेल्या आनंदी गोपाळ : एक संघर्ष गाथा या चित्रपट समीक्षेस प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विभागून मिळवले आहे. स्नेहल तानाजी कोळी बी.ए .भाग १ हिने ‘रिमझिम बरसती पाउसधारा ‘या ललित लेखनास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. ऋतुजा शांतीलाल पाटील बी.ए .भाग -१ हिने लिहिलेल्या ‘झुंज ‘या कथेस द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले तर उर्मिला राजेंद्र ससाणेबी.ए .भाग -३ हिने लिहिलेल्या ‘समाजमाध्यमांचा तरुणावर होणारा परिणाम ‘या संशोधन लेखनास द्वितीय क्रमांक मिळाला आहे.उदय नितीन फाळके बी.ए.३ [मराठी ] यांने लिहिलेल्या ऑलिम्पिक वीर पैलवान खाशाबा जाधव ‘या व्यक्तीचित्रनास द्वितीय क्रमांक मिळाला .हिंदी भाषेत आदिती जाधव हिने लिहिलेल्या ‘महाभारत के नायक नायिका कि त्रासदी : भटको नही धनंजय ‘या समीक्षा लेख्ननास प्रथम क्रमांक मिळाला .आशुतोष भोसले व तुषार गायकवाड बी.ए .भाग -१ यांनी लिहिलेल्या रंगकर्मी तुषार भद्रे जी के साथ वार्तालाप ‘या मुलाखतीस दुसरा क्रमांक मिळाला.सानिका बजरंग माळवदकर हिने लिहिलेल्या ‘अबला नही हु मै’ या एकांकिकेस तृतीय क्रमांक मिळाला. इंग्रजी भाषेतील आरजू आलीम तांबोळी हिच्या Decadence of Indian culture या माहितीपर लेखनाचा विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळाला .दिलीप कोंडीराम हंकारे याने काढलेल्या व्यंगचित्रास तृतीय तर वैभव शेडगे याने काढलेल्या छायाचित्रास द्वितीय क्रमांक मिळाला .या यशाबद्ल यशस्वी विद्यार्थ्यांचे व संपादक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे व संपादक मंडळ यांचे अभिनंदन प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांनी केले.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sun 30th Oct 2022 07:56 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sun 30th Oct 2022 07:56 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sun 30th Oct 2022 07:56 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sun 30th Oct 2022 07:56 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 30th Oct 2022 07:56 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 30th Oct 2022 07:56 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sun 30th Oct 2022 07:56 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sun 30th Oct 2022 07:56 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sun 30th Oct 2022 07:56 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sun 30th Oct 2022 07:56 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sun 30th Oct 2022 07:56 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sun 30th Oct 2022 07:56 am













