राहुल गांधी यांची खासदारकी रद्द…राजकारणात मोठी खळबळ

सातारा न्यूज: मोदी आडनावावरून बदनामीकारक वक्तव्य केल्याने काँग्रेसचे नेते राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. यामुळे राहुल यांना धक्का मिळाला. कोर्टाकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे त्यांचे संसदीय सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात राहुल यांनी कर्नाटकातील कोलार येथील एका सभेत, नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव एकच का आहे? सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे? असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याबाबत भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी तक्रार दाखल करताना राहुल यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन सुरत न्यायालयाने काल राहुल यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. तथापि, राहुल यांना लगेच जामीन मंजूर करण्यात आला आणि या निर्णयाविरुद्ध अपील करता यावे, यासाठी त्यांची शिक्षा 30 दिवसांसाठी स्थगित करण्यात आली. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम ८ अन्वये ही कारवाई करण्यात आलेली आहे. मोदी आडनावावरून राहुल यांनी बदनमीकारक वक्तव्ये केले होते. या प्रकरणी गुरुवारी सुरत जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. याप्रकरणी त्यांचा १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मजूर करण्यात आला. पण कोर्टाने ही शिक्षा सुनावल्यानंतरच त्यांची खासदारकी धोक्यात आली होती. खासदारकी अपात्रता या निर्णयानंतरच लागू करण्यात आली होती. यानुसार आज त्यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याची अधिकृत घोषणा लोकसभा सचिवालयाकडून करण्यात आली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला