कोरेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र विठ्ठलवाडी, अंबवडे सं. कोरेगाव साधूसंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी.प.पू. सद्गुरु श्री. निळकंठ भारती गुरू गोविंद भारती यांची महासंजीवन समाधी.

विठ्ठलवाडी म्हणजेच बाबांची प्रतीशिर्डी ज्यांना घडेना शिर्डी । त्यांनी यावे विठ्ठलवाडी ।।

महाराष्ट्रातील सातारा जिल्हा,यामधील कोरेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र विठ्ठलवाडी, अंबवडे सं. कोरेगाव. हे गाव. ही भूमी साधूसंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली असून येथेच प.पू. सद्गुरु श्री. निळकंठ भारती गुरू गोविंद भारती यांची महासंजीवन समाधी  या पंचक्रोशी मध्ये सुप्रसिद्ध आहे. 

।। अल्परीचय ।।

१) श्रींचा जन्म: सोमवार श्रावण वद्य अष्टमी ( गोकुळ अष्टमी ) शके १८०४ इ.स.१८८२ कोलवडी, ता.कोरेगाव जि. सातारा.
२) गुरू परंपरा: काशी क्षेत्र,शिवालाघाट,निरंजन नागा आखाडा,गुरू गोविंद भारती.
३) सोनंदग्रामी संन्यास दिक्षा,गाणगापूर येथे तीन तपे ( ३६ वर्षे ) तपश्चर्या,व श्रीदत्तात्रेय साक्षात्कार आणि दिव्य धर्मप्रचार आदेश.
४) सोनंदग्रामी श्रीराम मंदिर उभारणी व १० वर्षे वास्तव्य. नंतर जिहे-काठापूर ( जि. सातारा ).धुमाळवाडी ( ता. फलटण ),बर्गेवाडी ( ता.कोरेगाव ), किन्हई ( ता.कोरेगाव ) येथे वास्तव्य.शेवटी विठ्ठलवाडी-अंबवडे ( ता.सं. कोरेगाव ) येथे कायमचे वास्तव्य.
५) महासंजीवन-समाधी: कार्तिक शुद्ध एकादशी, बुधवार शके १९०५ दि.१६/११/१९८३.

।। ग्रामदैवत श्रीखंडोबा, श्रीनिळकंठबाबा आणि श्रीसाईबाबा (दिव्य आदेश आणि महिमा) ।।

१९६९ च्या दरम्यान श्रीबाबा शंभूमहादेव देवस्थान, किन्हई, ता.कोरेगाव येथे भगवत सेवेत, धर्मप्रचारार्थ राहत होते. सर्व संतांच्या प्रमाणे त्यांनी सत्यव्रताचे आचरण ठेवले होते. ज्या ज्या वेळी असत्य आचरण दिसून आले, त्या त्या वेळी बाबांनी त्या ठिकाणांचा लगेच त्याग केला. असेच काहीसे किन्हई येथे घडले व बाबांनी किन्हई सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी जगताप आज्जीनीं विनंती केली की बाबा आपण ग्रंथ समाप्ती झाल्यावरच येथून  जाण्याचे करावे. त्याशिवाय आम्हीं तुम्हांला जाऊ देणार नाही. श्रींनी ते मान्य केले. भक्त श्री. जगताप रा. किन्हई यांचे घरी रात्री ८ ते १० या वेळेत हरीविजय ग्रंथ वाचन व प्रवचन केले. पण दिवसभरामध्ये त्यांची या पंचक्रोशीमध्ये भ्रमंती चालू होती. असेच एकेदिवशी अंबवडे ( ता.सं. कोरेगाव ) च्या जागृत स्वयंभू श्रीखंडोबा मंदिरांमध्ये बाबा ध्यान लावून बसले होते. श्रीखंडेरायांनी बाबांना दिव्यआदेश दिला, "आपले ठिकाण येथून एक फर्लांगावर आहे. आपण आमच्या आश्रयाला या पंचक्रोशीतच कायमचे रहावे" तद्वत श्रीबाबांचे जुनारा ( सध्याचे श्री क्षेत्र विठ्ठलवाडी, अंबवडे. ) येथे जाणे झाले. इथल्या भक्त मंडळींनी बाबांना ठेवून घेतले. प्रथम ते गं.भा. कमलताई क्षीरसागर यांच्या  घरी राहत असत. पुढे त्यांनी श्रीविठ्ठल मंदिर स्थापन केले व तेथेच कायमचे वास्तव्य केले आणि बाबांनी जुनारा गावचे नामकरण " विठ्ठलवाडी" असे केले. तेथे आता भव्य मठनिर्मिती झाली असून बाबांनी सांगितलेला अखंड नित्यनेम चालू आहे.

।। श्रीसाईबाबा व श्रीनिळकंठबाबा एकच ।।

१) शिर्डीमध्ये श्रीखंडोबारायांच्या मंदिरात पहिल्यांदा श्रीसाईबाबांचे येणे झाले व खंडोबारायांच्या आदेशानुसार "शिर्डीतच कायमचे रहाणे झाले"  त्याच तऱ्हेने श्रींबाबांचे अंबवडे येथे श्रीखंडोबारायांच्या आदेशानुसार "विठ्ठलवाडी ( अंबवडे ) येथे कायमचे रहाणे झाले"
२) श्री सद्गुरु निळकंठ भारती महाराजांचे शिष्य श्रीबळवंत भारती (दाजी महाराज) यांनी शिर्डीमध्ये श्रीसाईबाबांच्या महासंजीवन समाधीला अभिषेक करून नवस मागितला की, "तुमच्यासारखे बाबा आम्हांला भेटू द्या" आणि १ महिन्यातच श्रींबाबांची व दाजी महाराजांची भेट झाली. भेटीनंतर तीर्थयात्रेसाठी कोठेही जायचे नाही, पण शिर्डीला एकदा जावून यावे अशी आज्ञा केली. तिकडेच फक्त का जायचे? असे विचारल्यावरून, बोललेला नवस पूर्ण झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करायला जायला पाहिजे दाजी! असे श्रीबाबा उत्तरले. हेच श्री बाबांचे आणि साईबाबांचे एकरूपत्व सिद्ध करणारी रुजू-रुजूवात आहे
३) रामनिकेतन, सांगली येथील प.पू. सद्गुरू श्रीदासराम महाराज, ज्यांच्या घरी गेली ९९ वर्षे अखंड किर्तन सेवा चालू आहे. ते कीर्तनात सांगावयाचे, भगवान श्रीदत्तात्रेयांचा "साईबाबांच्या " अवतारानंतर जर महाराष्ट्रात कोणता अवतार झाला असेल तर ते म्हणजे "निळकंठबाबा. "
४) शिर्डीत श्रीसाईबाबांनी महासंजीवन समाधी घेतली तेंव्हा त्यांच्या परमभक्त लक्ष्मीबाई तेथे होत्या. त्यावेळी ते म्हणाले, "तू साईची खूप भक्ती ( सेवा ) केली आहेस. रोज भिक्षा दिलीस,आज दक्षिणा घे. तुझ्या साईच्या मुठीमध्ये नवविधाभक्ती आहेत, हे तुझ्या ओटीत घे" आणि साईबाबांनी लक्ष्मीबाईच्या ओटीत पैशाच्या रूपात नवविधाभक्ती दिल्या व महासंजीवन समाधी घेतली. तद्वतच श्रीनिळकंठ बाबांनी ज्यावेळी महासंजीवन समाधी घेतली. त्यावेळी श्रींबाबांची परमभक्त गिरीजा-मावशी सोबतच होत्या, त्यावेळी श्रीनिळकंठ- बाबांनीही श्रीसाईबाबांच्या सारखेच दहा रुपयाच्या नोटेच्या माध्यमातून मावशींना नवविधाभक्ती आणि दहावी माधुरीप्रेमभक्ती देऊ केली.
            वरील घटनांवरून श्रीनिळकंठबाबा  व श्रीसाईबाबा वेगळे नसून एकच आहेत. हाच बोध श्रीखंडोबारायांनी आणि आत्मज्ञानी संतांनी आपणां सर्व भक्तांना दिला आहे.

विठ्ठलवाडी म्हणजेच बाबांची प्रतीशिर्डी
ज्यांना घडेना शिर्डी । त्यांनी यावे विठ्ठलवाडी ।।

साधू दिसती वेगळाले । परी ते स्वरुपी मिळाले । अवघें मिळोन एकची जालें । देहातीत वस्तू ।।  (समर्थ रामदास स्वामी)

मठाधिपती - प.पू.श्री.सोहम निरंजन भारती. श्री क्षेत्र विठ्ठलवाडी - अंबवडे. ता.सं.कोरेगाव, जि. सातारा.
मो.नं. :- ९८३३४६८३२१.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला