सातारा शहर परिसरामध्ये भर पावसात अतिक्रमण हटाव मोहीम
Satara News Team
- Fri 7th Jul 2023 09:55 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा शहर परिसरामध्ये रस्ते अरुंद असल्यामुळे नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. त्यात रस्त्यावरील पार्किंग तेथेच पथविक्रेत्यांची गर्दी दुकानदारांनी रस्त्यावर टाकलेल्या लोखंडी जाळ्या यामुळे मोती चौक ते 501 पाटी या परिसरामध्ये दुचाकीस्वारांची चांगलीच कसरत होते.
सातारा : सातारा शहरांमध्ये शुक्रवारी पावसाने जोर धरलेला असताना भर पावसात सातारा पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने मोती चौक ते 501 पाटी यादरम्यान लोखंडी जाळ्या आणि बोर्ड जप्त करण्याची कारवाई केली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे विक्रेत्यांची चांगलीच पळापळ झाली. या कारवाईमध्ये तब्बल 18 बोर्ड आणि नऊ लोखंडी जाळ्या जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. यापुढेही ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचा इशारा अतिक्रमण पथकाच्या विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
सातारा शहर परिसरामध्ये रस्ते अरुंद असल्यामुळे नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. त्यात रस्त्यावरील पार्किंग तेथेच पथविक्रेत्यांची गर्दी दुकानदारांनी रस्त्यावर टाकलेल्या लोखंडी जाळ्या यामुळे मोती चौक ते 501 पाटी या परिसरामध्ये दुचाकीस्वारांची चांगलीच कसरत होते. हा बाजारपेठेचा भाग असल्यामुळे वाहतुकीची कोंडी निस्तरताना वाहतूक पोलिसांना बरेच प्रयत्न करावे लागतात. विनाकारण झालेल्या अतिक्रमणांच्या संदर्भात दक्षता समितीच्या बैठकीत वेळोवेळी आवाज उठवला जातो. मात्र प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याच्या तक्रारी होत्या. पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाकडे सुद्धा या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या सूचनेप्रमाणे अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख प्रशांत निकम आणि त्यांच्या टीमने शुक्रवारी सकाळी भर पावसात कारवाईला सुरुवात केली. यावेळी एक डंपर आणि नऊ कर्मचारी या कारवाई सहभागी झाले होते. या झटपट कारवाईमध्ये लोखंडी जाळ्या आणि रस्ते अडवणारे बोर्ड जप्त करण्यात आले. या कारवाई दरम्यान काही विक्रेत्यांशी पालिकेच्या कर्मचाऱ्यांची शाब्दिक चकमक झाली. मात्र कोणत्याही चकमकीला न जुमानता कारवाई कठोरपणे सुरू ठेवण्यात आली. काही पथविक्रेत्यांची बैठी दुकाने सुद्धा हटवण्यात आली.
रस्ता जितका मोकळा करता येईल तेवढा मोकळा करण्यात आला. 501 पाटीच्या परिसरातील काही चप्पल विक्रेत्यांना सुद्धा हटवण्यात आले. सुमारे एक तास ही कारवाई सुरू होती. या कारवाईचे नागरिकांनी कौतुक केले आहे. विक्रेत्यांनी विनाकारण दुकानासमोर लोखंडी जाळ्या टाकून वाहतुकीची कोंडी करू नये. अन्यथा पुन्हा कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेच्या अतिक्रमण पथकाने दिला आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 7th Jul 2023 09:55 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 7th Jul 2023 09:55 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 7th Jul 2023 09:55 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 7th Jul 2023 09:55 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 7th Jul 2023 09:55 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 7th Jul 2023 09:55 pm
संबंधित बातम्या
-
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 7th Jul 2023 09:55 pm
-
शेडगेवाडी पोलीस पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला...
- Fri 7th Jul 2023 09:55 pm
-
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 7th Jul 2023 09:55 pm
-
सुट्टीतही पटपडताळणी, चहा-पाणीची चर्चा; महाबळेश्वर तालुक्यात शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह
- Fri 7th Jul 2023 09:55 pm
-
खटावच्या विद्यमान तहसिलदारांनी खटावच्या जनतेला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून दिले?
- Fri 7th Jul 2023 09:55 pm
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Fri 7th Jul 2023 09:55 pm
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Fri 7th Jul 2023 09:55 pm











