राजकीय द्वेषापोटी चालक सुरक्षारक्षक या पदावरून तडकाफडकी काढल्याने उपासमार....
Satara News Team
- Thu 3rd Nov 2022 09:35 am
- बातमी शेयर करा
कास पठार कार्यकारी समितीच्या माध्यमातून सन 2017 पासून कास पठार वर समितीच्या वाहनावर चालक तसेच सुरक्षारक्षक म्हणून भगवान धोंडीबा आखाडे संदीप मोहन साळुंखे आत्माराम तुकाराम आखाडे अंकुश रामचंद्र अहिरे हे कार्यरत होते या ठिकाणी जबाबदारीने सर्व काम पार पाडली जात होती समितीच्या स्थानिकांना रोजगार या धोरणानुसार या पदावर रुजू करण्यात आलं होतं मागील पाच वर्षापासून इमानदारीने काम करूनही कसलीही कल्पना न देता अचानक पणे वरील कामगारांना कमी करण्याचे तोंडी सांगण्यात आलेला आहे त्यामुळे प्रचंड मानसिक तणाव निर्माण झाला आहे तसेच कुटुंबाच्या भविष्याविषयी चिंता सतावत आहेत मागील पाच वर्षात उमेदीच्या काळात कामगारांचा समितीने वापर करून अचानक पणे कामावरून कमी करून रस्त्यावर आणलेला आहे त्यामुळे कामगारांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे
सदर ठिकाणी काम करत असताना कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार केला नसताना देखील कामावरून कमी कोणत्या कारणाने केलं याची माहिती अद्यापही मिळाली नाही त्यामुळे कामगारांवर फार मोठा अन्याय झालेला आहे कास पठार समिती एका सदस्याच्या मनमानीने सुरू असते सगळे निर्णय जवळपास ती व्यक्ती घेत असते सदस्य सदस्य व्यक्ती पठारावर सर्वांना राजकीय दबावाचा वापर करून दडपण निर्माण करते सतत कामगारांना वेट बिगाराची वागणूक देते अपमानास्पद वागू नुक धमकी मनमानी करणे वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकने असे उद्योग करत असते अलीकडे जिल्हाधिकारी यांनी कास पठारावर कास महोत्सवाचे आयोजन केले होते या महोत्सवासाठी जमिनीची गरज होती सदर कार्यक्रमासाठी या कामगारांमधील एका कर्मचाऱ्यांनी त्याची जमीन उपलब्ध करून दिली म्हणून राजकीय आक्सापोटी द्वेष बुद्धीने इतर सर्व कामगारांना कामावरून कमी करण्यात आले आहे अचानक पणे हा खूप मोठा आघात कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेला आहे यामुळे कर्मचाऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागणार आहे कास पठारावर वाहन चालवणे सुरक्षा पुरवणे वनवे भिजवणे, जंगलात पानवट्यावर पाणी सोडणे कास पठारावरील निसर्ग वाचवणे अशी जबाबदारीची कामे इमानदारीने करून देखील कर्मचाऱ्यांवर राजकीय द्वेषापोटी अशी वेळ आलेली आहे कास पठार च्या लगतच्या परिसरात सदर कर्मचारी वास्तव्यास असून त्यांना सध्या अन्य कोणतेही उपजीविकेचे साधन नाही कास पठारावर सुरू असलेल्या मनमानीला कंटाळून विद्यमान अध्यक्ष यांनी वन विभागाकडे राजीनामा दिला होता तसेच उपाध्यक्ष देखील लवकरच राजीनामा देणार आहेत तरी कर्मचाऱ्यांना अचानकपणे कामावरून कमी करून उपासमार होऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेला आहे.
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Thu 3rd Nov 2022 09:35 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Thu 3rd Nov 2022 09:35 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Thu 3rd Nov 2022 09:35 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Thu 3rd Nov 2022 09:35 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Thu 3rd Nov 2022 09:35 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 3rd Nov 2022 09:35 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 3rd Nov 2022 09:35 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 3rd Nov 2022 09:35 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 3rd Nov 2022 09:35 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 3rd Nov 2022 09:35 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 3rd Nov 2022 09:35 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 3rd Nov 2022 09:35 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 3rd Nov 2022 09:35 am













