चिलेवाडीतील रणरागिनींचा रुद्रावतार
बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यास बेदम चोप, दारूच्या बाटल्या फोडल्या
मुकुंदराज काकडे - Thu 2nd Feb 2023 12:05 pm
- बातमी शेयर करा
कोरेगाव: कोरेगाव तालुक्यातील भाडळे गावानजिक असलेल्या मुख्य चौकात आमलेट पावच्या गाड्यावर बेकायदेशीररित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या एका विक्रेत्यास चिलेवाडीतील रणरागिनींनी बेदम चोप दिला व पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेल्या देशी दारूच्या बाटल्या फोडल्या. ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. दरम्यान, या प्रकाराची कोणत्याही स्वरूपाची नोंद वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात झालेली नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नव्याने झालेल्या वाठार स्टेशन -डिस्कळ रस्त्यावर कोरेगाव तिकाटण्यावर डिस्कळ येथील एका व्यक्तीने आमलेट पावचा गाडा सुरू केला आहे. या गाड्यावर तो बेकायदेशीरित्या देशी दारूची विक्री करत होता. देशी दारूचा दारूच्या विक्रीमुळे अनेक जणांची पावले कळत नकळतपणे गाड्याकडे वळत होती. चिलेवाडीतील महिला दारू विक्रेत्याच्या उपद्रवामुळे अक्षरशः हैराण झाल्या होत्या. एकदा - दोनदा प्रयत्न करून देखील दारू विक्री थांबत नसल्याने मंगळवारी दुपारच्या सुमारास रणरागिनींनी रुद्रावतार धारण केला आणि थेट आमलेट पावच्या गाड्यावर हल्लाबोल केला. दारू विक्रेत्यास बेदम चोप देत देशी दारूच्या बाटल्या फोडून टाकल्या. रणरागिनींच्या रुद्रावतारापुढे हातबल झालेल्या विक्रेत्याने यापुढे देशी दारूची विक्री करणार नसल्याचा कबुली जवाबच देऊन टाकला. या प्रकाराचा व्हिडिओ समाज माध्यमावर बुधवारी दुपारपासून मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आणि वाठार स्टेशन पोलीस ठाण्यातील दूरध्वनी खाणाणू लागला. अनेकांनी भाडळे खोऱ्यातील गावांमध्ये संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. घडलेला प्रकार हा सत्य आहे, मात्र त्याबाबत कोणत्याही प्रकारची नोंद वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात झालेली नव्हती. एकूणच कोरेगाव तालुक्याच्या भाडळे खोऱ्यात रणरागिनींच्या रुद्रावतरामुळे देशी दारूची बेकायदेशीर विक्री मात्र थांबली आहे.
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Thu 2nd Feb 2023 12:05 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Thu 2nd Feb 2023 12:05 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Thu 2nd Feb 2023 12:05 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Thu 2nd Feb 2023 12:05 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Thu 2nd Feb 2023 12:05 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 2nd Feb 2023 12:05 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 2nd Feb 2023 12:05 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 2nd Feb 2023 12:05 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 2nd Feb 2023 12:05 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 2nd Feb 2023 12:05 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 2nd Feb 2023 12:05 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 2nd Feb 2023 12:05 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 2nd Feb 2023 12:05 pm













