दूसरा श्रावणी सोमवार आणि प्रदोष व्रताचा अद्भुत योगायोग, जाणून घ्या शुभ मुहूर्त
Satara News Team
- Mon 28th Aug 2023 10:27 am
- बातमी शेयर करा
आज श्रावण शुक्ल पक्षाची द्वादशी तिथी आहे. आजचा दिवस अतिशय शुभ योग घेऊ आला आहे, कारण आज निज श्रावण महिन्यातील दूसरा सोमवार आणि सोम प्रदोष व्रत असा दुहेरी योग आहे. यासोबतच सौभाग्य योग, सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, आयुष्मान योग यांचाही शुभ मेळ साधण्यात आला आहे. असे मानले जाते की प्रदोष व्रत शिवभक्तांचे सर्व दोष दूर करते आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करते. आज महादेवाची विधिवत पूजा केली जाईल. रुद्राभिषेकासाठीही आजचा दिवस खूप शुभ आहे. श्रावण महिन्यातील सोमवारी येणाऱ्या प्रदोष व्रताचे महत्त्व अधिकच वाढते.
पूजेसाठी शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, सोमवार, 28 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 06:22 पर्यंत, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी राहील. यानंतर त्रयोदशी तिथी सुरू होईल. अशावेळी तुम्ही सकाळी सोमवार व्रत आणि संध्याकाळी प्रदोष व्रताची पूजा करू शकता.
मेष राशी : व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. मनाप्रमाणे व्यापारात लाभ होईल. विरोधकांपासून सावध रहा. गुंतवणूक करताना व्यवस्थित माहिती करुन मगच निर्णय घ्या. कुटुंबातील सदस्यांसोबत धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आजचा शुभ रंग - पांढरा.
वृषभ राशी : आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. काम पूर्ण झाल्याचे पैसे बऱ्याच दिवसांपासून रखडलेले होते ते मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. स्पर्धेत तुम्ही यशस्वी व्हाल. आजचा शुभ रंग - जांभळा.
मिथुन राशी : आजचा दिवस धावपळीचा असेल. व्यापाऱ्यांना मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही योजनेची सुरुवात करण्यापूर्वी व्यवस्थित विचार करुन निर्णय घ्या. सासरच्या व्यक्तींसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - नारंगी.
कर्क राशी : आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. व्यापाऱ्यांना विशेष डील मिळेल आणि मोठा धनलाभ होईल. घाई-गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. गुंतवणूक करण्यावर भर द्याल. आजचा शुभ रंग - निळा.
सिंह राशी : बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होईल. रखडलेले काम मार्गी लागल्याने आनंदाचे वातावरण असेल. घरी पाहुण्यांचे आगमन होईल. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - जांभळा.
कन्या राशी : नव्या नोकरीची संधी चालून येईल. गुंतवणूक करण्यावर भर द्याल. मुलांसोबत वेळ घालवाल. बाहेर फिरायला जाण्याचं नियोजन कराल. अचानक तुम्हाला गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - हिरवा.
तूळ राशी : संपत्ती खरेदी-विक्रीचा निर्णय घ्याल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला अतिशय गुप्त अशी माहिती मिळण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना काळजी घ्या. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - निळा.
वृश्चिक राशी : वाहन चालवताना काळजी घ्या. आई-वडिलांच्या आशीर्वादाने कामाची सुरुवात करा. नोकरी करणाऱ्यांना मनाप्रमाणे काम मिळाल्याने प्रसन्न होतील. रखडलेले काम मार्गी लागेल. नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आजचा शुभ रंग - हिरवा.
धनु राशी : मेहनतीच्या जोरावर तुम्हाला चांगले यश प्राप्त होईल. नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. आजचा शुभ रंग - पिवळा.
मकर राशी : आजचा दिवस धावपळीचा असेल. डोळ्यांच्या संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी चांगली संधी प्राप्त होईल. विरोधकांपासून सावध रहा. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल. आजचा शुभ रंग - जांभळा.
कुंभ राशी : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप लाभदायक असणार आहे. खाण्या-पिण्याच्या गोष्टींवर लक्ष द्या. आरोग्याची काळजी घ्या. खर्चात वाढ होईल. डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. नव्या नोकरीसाठी प्रयत्न कराल. आजचा शुभ रंग - लाल.
मीन राशी : आज दिवसभरात अनेक समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. नव्या नोकरीसाठी प्रयत्न कराल. व्यापाऱ्यांना चांगला लाभ होईल. आरोग्याची काळजी घ्या. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळा. आजचा शुभ रंग - केशरी.
#PiscesHoroscope
#AquariusHoroscope
#CapricornHoroscope
#Scorpio
#ScorpioHoroscope
#Libra
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Mon 28th Aug 2023 10:27 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Mon 28th Aug 2023 10:27 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 28th Aug 2023 10:27 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 28th Aug 2023 10:27 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 28th Aug 2023 10:27 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 28th Aug 2023 10:27 am
संबंधित बातम्या
-
गुरुवारी { उद्या } पहाटे पूर्व आकाशात अनुभवता येणार शुक्र-मंगळ युतीचा नजारा
- Mon 28th Aug 2023 10:27 am
-
मैत्री एक नातं रक्तापलिकडचं....!
- Mon 28th Aug 2023 10:27 am
-
दहीहंडीचा दिवस तुमच्यासाठी कसा? वाचा आजचे राशीभविष्य
- Mon 28th Aug 2023 10:27 am
-
'या' राशींनी आज घ्या काळजी, असा आहे बुधवारचा दिवस
- Mon 28th Aug 2023 10:27 am
-
वृषभ, कन्या, मकर, मीन राशीच्या लोकांनी मंगळवारी या गोष्टी करू नयेत, जाणून घ्या कसा असेल दिव
- Mon 28th Aug 2023 10:27 am
-
2 September: 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, धनलाभ होईल
- Mon 28th Aug 2023 10:27 am
-
सप्टेंबर महिन्याची सुरुवात दमदार होणार, 'या' राशीच्या व्यक्तींना होणार लाभ
- Mon 28th Aug 2023 10:27 am
-
31 august: ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस तुमच्यासाठी कसा? वाचा राशीभविष्य
- Mon 28th Aug 2023 10:27 am













