प्रधान संकल्प, ध्वजारोहणाने नटराज मंदिरात वार्षिक रथ महोत्सवाला प्रारंभ

5 जानेवारीला सातारा शहरातून नटराज रथाची भव्य मिरवणूक

सातारा : सर्व जगात कोरोना सारख्या महामारीचा उद्भव पुन्हा होऊ नये , सर्वांना चांगले आयु आरोग्य प्राप्त व्हावे.सर्वत्र सुख शांती  नांदावी भारत देश हा सुजलाम सुफलाम होऊन एक आदर्श राष्ट्र बनावे असा भव्य दिव्य आणि सर्वांच्या हिताचा संकल्प प्रधान संकल्प म्हणून करत सातारा येथील श्री श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरातील 2023 च्या वार्षिक रतन महोत्सवाच्या उपक्रमाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला .
श्री कांची काम कोटी पिठाचे महास्वामी परमपूज्य शंकराचार्य श्री श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीजी तसेच कामकोटी पीठ अधिपती परमपूज्य श्री श्री जयेंद्र सरस्वती व त्यांचे शिष्य विद्यमान शंकराचार्य परमपूज्य श्री श्री शंकर विजयेन्द्र सरस्वती यांचे पूर्णानुग्रह आणि शुभ कृपाशीर्वादाने यावर्षीच्या भव्य दिव्य श्री उत्तर चिदंबरम नटराज रत्न महोत्सवाला प्रारंभ झाला .
येत्या सहा जानेवारीपर्यंत या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले आहे दरम्यान या महोत्सवाचा प्रारंभ रविवारी सायंकाळी मंदिर परिसरात ध्वजारोहणाने झाला याप्रसंगी मंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानबाग यांच्या सुविद्य पत्नी सौंद भाग वेदमूर्ती दत्ता शास्त्री गुरुजी वेदमूर्ती जगदीश भट यांचे समावेश मंदिराचे व्यवस्थापक चंद्रन, सौ. आचल घोरपडे ,नारायणराव यांच्यासह वासुदेव नायर, प्रशांत अहिवळे उपस्थित होते .
आज सोमवारी सकाळी सहा वाजता पुण्याहवाचन आणि प्रधान संकल्प सोडून या महोत्सवाच्या धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला मंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश  शानभाग व सौ. उषा  शानभाग   यांच्या हस्ते गणेश पूजन वरून तसेच इतर देवतांचे कलश स्थापना करून आवाहन करून या महोत्सवाला पूजा विधिद्वारे प्रारंभ झाला मंदिराच्या प्रांगणात असलेल्या चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी महाराजांच्या नावाने असलेल्या कला मंचावर पूर्व बाजूला विजयेंद्र  सरस्वती शंकराचार्य स्वामी महाराजांच्या भव्यप्रतिमे पुढे हे विविध देवदेवतांचे कलश स्थापन करण्यात आले .वेदमूर्ती दत्ता शास्त्री जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेदमंत्रांचा जयघोष करत या प्रधान संकल्प नंतर नांदी श्राद्ध ,पुण्याहवाचन अधिक कार्यक्रम संपन्न केले .त्यानंतर गणपती होम करण्यात आला .यावेळी वेदमूर्ती दत्ता शास्त्री जोशी यांचे सोबत रोहित आपटे व सहकार्यांनी होम कुंडा मध्ये  तूप व अहुती यांचे दान केले .
या सर्व कार्यक्रमासाठी सनईच्या मंगल सुरांची बरसात अभिजीत जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली महोत्सवानिमित्त मंदिर प्रांगण विद्युत रोषणाई नी झगमगून गेले असून एलईडी लाईटच्या विविधरंगी प्रकाशातील मंदिराचे हे आगळे वेगळे रूप पाहण्यासाठी सातारकरांची गर्दी होत आहे दरम्यान सोमवारी सायंकाळी राधा कृष्णाचा कल्याण उत्सव अर्थात विवाह सोहळा मंगलाष्टकांच्या सुमधुर निनादात संपन्न झाला.
 मंगळवारी सकाळी गण होम होऊन सायंकाळी पाच ते सहा या वेळेत मंदिर प्रांगणात मंदिरातील विघ्नहर्ता गणरायाच्या उत्सव मूर्तीचा रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.गुरुवारी 5 जानेवारी रोजी या रथोत्सव सोहळ्याचा प्रमुख दिवस असून पहाटे पाच वाजता श्री गणपती होम होऊन मूर्तीचे यात्रा दान म्हणजेच उत्सव मूर्तींच्या यात्रांचा प्रारंभ होणार आहे. 5 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता या वार्षिक रथोत्सव कार्यक्रमातील मुख्य रथ पूजन व रथप्रस्थानाचा शुभारंभ पाच जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे यासाठी सातारचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी तसेच सातारा विभागाचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री व सौ .सी.एम .ढबाले आणि सातारा येथील सुप्रसिद्ध लेखापरीक्षक अरुण एम .देवळेकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. माधुरी देवळेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत . रथ प्रस्थान होऊन रथयात्रा श्री नटराज मंदिर येथून सकाळी निघाल्यावर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्या मार्गे श्री साईबाबा मंदिर गोडोली तेथून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या परिसरातून पवई नाका येथे येईल. त्यानंतर नगरपालिका चौक, आनंदवाडी दत्त मंदिर मार्गे राज्यपथावरून  देवी चौक आणि राजवाडा येथे पोहोचेल. त्यानंतर मोती चौक द्वारे, शेटे चौक ,पोलीस हेडक्वार्टर द्वारे पवई नाका येथे रथोत्सव आल्यावर श्री कुबेर गणपती मंदिर मार्गे जिल्हा पोलीस अधीक्षक निवास, सर्किट हाऊस मार्गे हा रथ मिरवणुकीने नटराज मंदिरात सायंकाळी परत येईल. सायंकाळी सहा वाजता मान्यवर भक्तांच्या उपस्थितीत महामंगल आरती होणार आहे .
शुक्रवारी 6 जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता श्री गणपती होम होऊन श्री राधाकृष्ण शास्त्री मेमोरियल ट्रस्ट पुणे यांच्या वतीने श्री नटराज आला महाभिषेक तसेच लघुरुद्र होऊन नटराज शिवकामसुंदरी देवीचा कल्याण उत्सव अर्थात लग्न सोहळा होऊन त्यानंतर महामंगल आरती आणि महाप्रसाद वितरण केला जाणार आहे .
हा रथोत्सवाचा सर्व खर्च मंदिर तसेच जनता जनार्दनांच्या देणग्यांमधून केला जातो सर्व सातारा जिल्हावाशीयांनी या धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने तन ,मन ,धनने सहभागी होऊन आनंद घ्यावा असे आवाहन श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर साताराचे व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग व  रथोत्सव   सेवा समितीच्या विश्वस्तांनी केले आहे.

 

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला