खंडणी मागून कोयता दाखवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा
Satara News Team
- Wed 3rd Apr 2024 12:25 pm
- बातमी शेयर करा
सातारा : बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील चहाचे हॉटेल चालवायचे असेल तर दरमहा 5 हजार रुपयांची खंडणी मागून त्यापैकी 2200 रुपये घेवून उर्वरीत पैशांची मागणी करुन कोयता दाखवल्या प्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हर्षद संभाजी साळुंखे, जयदीप सचिन धनवडे (दोघे रा.क्षेत्रमाहुली ता.सातारा) यांच्या विरुध्द संदेश राजेंद्र जाधव (वय 24, रा.क्षेत्रमाहुली) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. 30 मार्च रोजी क्षेत्रमाहुली येथे घडली आहे. तक्रारदार संदेश जाधव हे गावात थांबले होते. त्यावेळी संशयित साळुंखे व धनवडे तेथे गेले. दोघांनी तक्रारदार यांना कोयता दाखवून हॉटेल चालवायचे असेल तर 5 हजाराची खंडणी मागितली. त्यानुसार 2200 रुपये दिले. राहिलेले पैसे दोन दिवसात दिले नाहीतर तुझी अवस्था तुझ्या चुलत्यासारखी करुन गोळ्या घालून जीव घेईन, अशी धमकी दिली. या घडलेल्या घटनेची माहिती तक्रारदार यांनी कुटुंबियांना दिल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Wed 3rd Apr 2024 12:25 pm
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Wed 3rd Apr 2024 12:25 pm
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Wed 3rd Apr 2024 12:25 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Wed 3rd Apr 2024 12:25 pm
संबंधित बातम्या
-
ढेबेवाडीत मगर बंधू ज्वेलर्समध्ये चोरी; नऊ तोळे सोने लंपास!
- Wed 3rd Apr 2024 12:25 pm
-
महामार्गावर कवठे गावानजीक एक किलो सोने दरोडेखोरांनी लुटले
- Wed 3rd Apr 2024 12:25 pm
-
खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी तीन हजारांची लाच; मंडलाधिकारी रंगेहाथ जाळ्यात
- Wed 3rd Apr 2024 12:25 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Wed 3rd Apr 2024 12:25 pm
-
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Wed 3rd Apr 2024 12:25 pm
-
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Wed 3rd Apr 2024 12:25 pm
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Wed 3rd Apr 2024 12:25 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Wed 3rd Apr 2024 12:25 pm













