सातारा कृषी विभागीय कार्यालयात दुपारीच सन्नाटा! शेतकर्यांमध्ये संताप
कुणाल खंदारे - Mon 8th Aug 2022 08:53 am
- बातमी शेयर करा
सातारा : जिल्ह्यात राज्य शासनाच्या कृषी विभागाचा बोर्या वाजला आहे. तालुका पातळीवर काम करणार्या विभागीय कृषी कार्यालयात वरिष्ठ अधिकारीच सापडत नसल्याने शेतकर्यांना प्रचंड मनस्ताप करावे लागत असून सातारा, कोरेगाव, खटाव तालुक्यातील शेतकरी सतत हा अनुभव घेत आहेत. सातारा कृषी विभागीय कार्यालय तर भरदुपारीच सामसूम असते. त्यामुळे कामानिमित्त आलेल्या शेतकर्यांना आल्या पावली माघारी जावे लागत असल्याने जिल्हा अधीक्षक, संचालकांनी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे.सातारा कृषी विभागीय कार्यालयांतर्गत सातारा, कोरेगाव तसेच खटाव हे तीन तालुके येतात. सध्या या तालुक्यांमध्ये कृषी विभागाकडून काय काम केले जाते हे वरिष्ठ व तालुक्यांत काम करणारे अधिकारीच सांगू शकतात. शेतीच्या हंगामामुळे शेतकर्यांना अनेकदा अडचणी येत आहेत. असे असतानाही सातारा विभागीय कृषी अधिकार्यांनी कुठे दौरे केल्याचे किंवा कारवाई केल्याचे समोर आलेले नाही. या कार्यालयांतर्गत तालुका पातळीवर असलेल्या काही कार्यालयांकडून दाद मिळत नाही. याच कार्यालयांनी गावागावात काही कंपू पोसले आहेत. त्यांनाच शेती येाजनांचा लाभ मिळताना दिसत आहे. त्यामुळे सरकारी योजनेतील खरे लाभार्थी वंचित राहू लागले असून तक्रारी वाढू लागल्या आहेत. न्यायाच्या अपेक्षेने वरिष्ठ कार्यालयाकडे येणार्या शेतकर्यांना वरिष्ठ अधिकारीच जर भेटत नसतील तर याला काय म्हणावे? या वैतागलेल्या शेतकर्यांनी सातारा विभागीय कृषी अधिकार्यांच्या कार्यालयावर मोर्चा आणण्याचे नियोजन केले आहे. फील्डवर आहे, मिटिंगमध्ये आहे, दौर्यावर आहे, साईटवर आहे अशी उत्तरे ऐकून शेतकरी वैतागले असून शेतकरी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा कृषी अधिक्षक तसेच कृषी संचालक, आयुक्तांनी सातारा विभागीय कृषी कार्यालयाच्या कारभारात लक्ष घालावे, अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे.
#sataragricultureoffice
#sataraagro
#sataracollectoroffice
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Mon 8th Aug 2022 08:53 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Mon 8th Aug 2022 08:53 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 8th Aug 2022 08:53 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 8th Aug 2022 08:53 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 8th Aug 2022 08:53 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 8th Aug 2022 08:53 am
संबंधित बातम्या
-
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Mon 8th Aug 2022 08:53 am
-
शेडगेवाडी पोलीस पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला...
- Mon 8th Aug 2022 08:53 am
-
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 8th Aug 2022 08:53 am
-
सुट्टीतही पटपडताळणी, चहा-पाणीची चर्चा; महाबळेश्वर तालुक्यात शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह
- Mon 8th Aug 2022 08:53 am
-
खटावच्या विद्यमान तहसिलदारांनी खटावच्या जनतेला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून दिले?
- Mon 8th Aug 2022 08:53 am
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Mon 8th Aug 2022 08:53 am
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Mon 8th Aug 2022 08:53 am











