रानडुकरांनी केलेल्या ऊसाच्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई द्यावी: अनिल थोरात यांची वन विभागाकडे निवेदनाद्वारे मागणी
Satara News Team
- Mon 7th Aug 2023 12:14 pm
- बातमी शेयर करा
कराड: मौजे मांगवाडी(शिवाजीनगर),ता.कराड हद्दीतील माझ्या मालकीच्या चिजदरा नावाच्या शेतशिवारातील ऊस पिकाच्या रानडुकरांनी केलेल्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी कळंत्रेवाडी येथील रहिवासी श्री अनिल प्रल्हाद थोरात यांनी लेखी निवेदनाद्वारे वन विभागाच्या वराडे येथील कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, मौजे मांगवाडी(शिवाजीनगर) गावच्या हद्दीत सर्व्हे नंबर १९ मधील चिजदरा नावाच्या शेतशिवारात माझ्या कुटुंबाच्या मालकीचे दोन एकर क्षेत्र आहे. त्यापैकी जवळपास पाच गुंठे क्षेत्रावरील ऊस पिकाचे रानडुकरांनी अतोनात नुकसान केले आहे.दरम्यान, शेताला लागूनच वन विभागाची हद्द असल्यामुळे दरवर्षी वन्य प्राण्यांकडून माझ्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होत असते.तरी माझ्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून स्थळ पाहणी करून पंचनामा करावा आणि मला नुकसान भरपाई द्यावी असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, यावेळी वराडे येथील वनपाल सागर कुंभार, वनरक्षक सचिन खंडागळे,वनसेवक शंभूराज माने आदि उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Mon 7th Aug 2023 12:14 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Mon 7th Aug 2023 12:14 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Mon 7th Aug 2023 12:14 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Mon 7th Aug 2023 12:14 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Mon 7th Aug 2023 12:14 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 7th Aug 2023 12:14 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 7th Aug 2023 12:14 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Mon 7th Aug 2023 12:14 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Mon 7th Aug 2023 12:14 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Mon 7th Aug 2023 12:14 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Mon 7th Aug 2023 12:14 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Mon 7th Aug 2023 12:14 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Mon 7th Aug 2023 12:14 pm













