आम आदमी पार्टीची महाराष्ट्रातील घौडदौड आता सातारा जिल्ह्यात : संदिप देसाई
मान्यवरांच्या उपस्थितीतीत शाखेसह संपर्क कार्यालयाचे भव्यदिव्य उद्घाटनSatara News Team
- Thu 9th Feb 2023 01:17 pm
- बातमी शेयर करा
सातारा : आम आदमी पार्टीची महाराष्ट्रातील घौडदौड आता सातारा जिल्ह्यात देखील होण्यास सुरुवात झालेली आहे. दि. 4 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील माण तालुक्यामधील जांभुळणी या दुर्गम व दुष्काळी गावात देखील आपची शाखा स्थापन झालेली आहे. ‘आप’च्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी या ठिकाणी संपर्क कार्यालय देखील सुरु करण्यात आलेले आहे.
या उद्घाटन कार्यक्रमासाठी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदिप देसाई यांची उपस्थिती होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणात आम आदमी पार्टीच्या राज्यात होत असलेल्या आपच्या कार्यांची माहिती देवून दिल्ली व पंजाब या ठिकाणी असलेल्या सरकारांची सुरु असलेली कार्यपध्दतीची माहिती दिली.
सातारा जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, संपूर्ण देशातील जनतेच्या मनामध्ये सध्या केंद्रातील व राज्यातील सरकारच्या विरोधात तीव्र अशा भावना आहेत. लोकांना विकासाचे स्वप्न दाखवून या सरकारांनी लोकांचा भ्रमनिरास केलेला आहे. या सर्व परिस्थितीमध्ये देशातील जनतेसमोर एकच आशेचा किरण दिसत आहे, तो म्हणजे आम आदमी पार्टी.
आम आदमी पार्टीने मागील दहा वर्षापासून दिल्ली राज्यामध्ये उत्तम व भ्रष्टाचारमुक्त असे सरकार दिलेले आहे. शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी करून आम आदमी पार्टीने लोकांना त्याचा फायदा मिळवून दिलेला. आहे. त्याच बरोबर नागरिकांना स्वस्त व उत्तम अशा आरोग्य सेवा उपलब्ध केलेल्या आहेत, चोवीस तास व माफक दरात वीज उपलब्ध करून दिली आहे. सरकारी कार्यालयातून मिळणारे दाखले व सेवा सुविधा लोकांच्या घरापर्यंत पोहचविण्याचे काम पक्षाने केलेले आहे. यामुळेच पंजाब राज्यात देखील लोकांनी आम आदमी पार्टीच्या कामकाजावर विश्वास ठेवून तेथे देखील आम आदमी पार्टीचे सरकार निवडून दिलेले आहे.
तसेच आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगांवकर यांनी मनोगतामध्ये सांगितले की, नुकत्याच गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये तेथील लोकांनी ‘आप’वर विश्वास दाखवून जे मतदान केले, त्यामुळे पक्षाला अल्प काळातच राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे व महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात ‘आप’ची संघटना मजबुतीकडे वाटचाल होत आहे. भविष्यात आम आदमी पार्टी सरकारमधील एक प्रबळ दावेदार म्हणून उभा करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहणे गरजेचे आहे. जनतेची साथ तर आहेच पण आपणही जनतेच्या विश्वासाला तडा जावू देता कामा नये.
यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र बाचल, जिल्हा प्रवक्ते निवृत्ती शिंदे, मारुती जानकर, माण तालुका अध्यक्ष अनिल हराळे, माण तालुका उपाध्यक्ष विक्रम काळेल, सचिन वाघमोडे यांनी मनोगते व्यक्ती केली.
या कार्यक्रमासाठी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदिप देसाई, आम आदमी पार्टी पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगांवकर, जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव, जिल्हा सचिव मारुती जानकर, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र बाचल, निवृत्ती शिंदे, रतन पाटील, अनिल जाधव, जाभुळणी सरपंच सुशीला काळेल, विक्रम काळेल, सचिन वाघमोडे, ऋषिकेश कारंडे, नितीन काळेल, दादासाहेब केंगार, प्रविण कुटे, योगेश काळेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 9th Feb 2023 01:17 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 9th Feb 2023 01:17 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Thu 9th Feb 2023 01:17 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 9th Feb 2023 01:17 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 9th Feb 2023 01:17 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 9th Feb 2023 01:17 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 9th Feb 2023 01:17 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 9th Feb 2023 01:17 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 9th Feb 2023 01:17 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 9th Feb 2023 01:17 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 9th Feb 2023 01:17 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 9th Feb 2023 01:17 pm













