जावळी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सादिक सय्यद यांची बिनविरोध निवड

पाचवड:जावली तालुक्यात एकमेव रजिस्टर्ड असलेल्या जावळी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी  पत्रकार सादिक सय्यद यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील पत्रकारांमध्ये समाधानाचे वातावरण असून विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

  पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव, सामाजिक प्रश्नांवरील अभ्यासू भूमिका आणि निष्पक्ष वृत्तांकन यामुळे सादिक सय्यद यांनी पत्रकारितेत वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जावळी तालुका पत्रकार संघ अधिक सक्षमपणे कार्य करेल, पत्रकारांचे विविध प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल तसेच पत्रकारांच्या हितासाठी विधायक उपक्रम राबविण्यात येतील, असा विश्वास  पत्रकार संघाचे मार्गदर्शक दत्ता पवार यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी कार्याध्यक्षपदी संदीप माने,उपाध्यक्षपदी संतोष मालुसरे,तर सचिवपदी विनोद वेंदे यांची निवड करण्यात आली.निवडीनंतर सादिक सय्यद यांनी संघटनेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले. पत्रकारांची एकजूट कायम ठेवून संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्कांसाठी तसेच समाजहिताच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

   यावेळी संघाचे मार्गदर्शक इम्तियाज मुजावर,जेष्ठ पत्रकार दत्ता पवार,महेश बारटक्के,संजय शेलाटकर,बापू वाघ,मोहसीन शेख,विशाल जमदाडे,जुबेर शेख,आदी सदस्य उपस्थित होते.

  त्यांच्या निवडीबद्दल विविध सामाजिक, राजकीय, प्रशासकीय तसेच पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला