नागठाणे कॉलेजमध्ये श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाचे आयोजन

देशमुखनगर : नागठाणेच्या आर्टस् ॲण्ड कॉमर्स कॉलेजमध्ये सांस्कृतिक विभाग व जिमखाना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  दि.१२ जानेवारी  २०२३ ते १९ जानेवारी २०२२ या कालावधीत श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.अजितकुमार जाधव यांनी दिली. सप्ताहाचे उद्घाटन  प्रतिमापूजन आणि प्रभात फेरीने होणार असून दुसऱ्या दिवशी शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराडचे माजी इतिहास विभाग प्रमुख प्रा.ए.जी.थोरात हे 'शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे : जीवन व कार्य' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.सप्ताहामध्ये
रांगोळी, निबंध, चित्रकला, वक्तृत्व इत्यादी स्पर्धांबरोबरच क्रीडा विभागाच्या वतीने सांघिक व वैयक्तिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या जन्मदिनानिमित्त ज्ञान शिदोरी दिन- ग्रंथदान व ग्रंथप्रदर्शन कार्यक्रम, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिक चालणे स्पर्धा इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर सप्ताहाच्या विविध स्पर्धा व उपक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.यशवंत हरी साळुंखे,नागठाणे गावच्या सरपंच सौ.रूपाली बेंद्रे, उपसरपंच श्री.अनिल साळुंखे, श्री.संजय साळुंखे, श्री.सचिन साळुंखे, श्री.मारुती जेधे,  महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री.गणेश साळुंखे व पदाधिकारी तसेच पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी रामकृष्ण विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजचे प्रा.विवेक पाटणे हे 'युवकांचे प्रेरणास्थान : स्वामी विवेकानंद' विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून कृषीभूषण मा.श्री.मनोहर (भाऊ) साळुंखे, नागठाणे भाग पत्रकार संघाचे अध्यक्ष मा.श्री.विकास जाधव हेही उपस्थित राहणार आहेत.याप्रसंगी सप्ताह मधील विविध स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे.सदर सप्ताहामध्ये विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.अजितकुमार जाधव यांनी केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला