नागठाणे येथून माय -लेक बेपत्ता, बोरगांव पोलीस ठाणे हद्दीत दोन दिवसातील तिसरी घटना
Satara News Team
- Wed 4th Jan 2023 06:35 pm
- बातमी शेयर करा
देशमुखनगर : हॉस्पिटल मध्ये रात्रपाळीस कामावर जाते म्हणून घरातून गेलेली महिला व तिचा ३वर्षाचा मुलगा घरी परत न आल्याने ते दोघे बेपत्ता झाल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.मनीषा भरत जाधव वय २२ वर्षे रा.नागठाणे व तिचा मुलगा आदर्श भरत जाधव असे दोघा माय- लेकांची नावे आहेत.या बाबतची फिर्याद भरत पोपट जाधव मूळ रा.निनाम सध्या रा.नागठाणे ता.सातारा यांनी दिली आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित महिला ही नागठाणे येथे तिच्या पतीसह वास्तव्यास आहे.तिचे पती हे शेतीच्या कामासाठी त्यांच्या मूळगावी निनाम ता.सातारा येथे गेले होते.
सोमवारी सायंकाळी ७ वाजता ही महिला तिच्या लहान मुलासह हॉस्पिटल मध्ये रात्र पाळीस कामावर जाते म्हणून घरातून गेली. दुसऱ्या दिवशी त्यांनी घरी जाऊन पाहिले असता त्यांची पत्नी व मुलगा घरी दिसून आला नाही .भरत जाधव यांनी पत्नी व मुलाचा सर्वत्र शोध घेतला तरी त्यांना ते मिळून आले नाहीत.या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Wed 4th Jan 2023 06:35 pm
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Wed 4th Jan 2023 06:35 pm
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Wed 4th Jan 2023 06:35 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Wed 4th Jan 2023 06:35 pm
संबंधित बातम्या
-
ढेबेवाडीत मगर बंधू ज्वेलर्समध्ये चोरी; नऊ तोळे सोने लंपास!
- Wed 4th Jan 2023 06:35 pm
-
महामार्गावर कवठे गावानजीक एक किलो सोने दरोडेखोरांनी लुटले
- Wed 4th Jan 2023 06:35 pm
-
खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी तीन हजारांची लाच; मंडलाधिकारी रंगेहाथ जाळ्यात
- Wed 4th Jan 2023 06:35 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Wed 4th Jan 2023 06:35 pm
-
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Wed 4th Jan 2023 06:35 pm
-
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Wed 4th Jan 2023 06:35 pm
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Wed 4th Jan 2023 06:35 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Wed 4th Jan 2023 06:35 pm













