मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची श्री मदनदादाभोसले यांनी घेतली विकास कामासाठी भेट
बापू वाघ- Fri 4th Nov 2022 06:38 am
- बातमी शेयर करा
महाबळेश्वर : सुरुर ते पोलादपूर मार्गास राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक व या रस्त्याच्या विकास आराखड्यास मंजुरी मिळावी यासाठी विशेष लक्ष घालून वाई, महाबळेश्वर तालुक्याच्या पर्यटन वाढीस, शेतीमाल वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी माजी आमदार मदन भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे केली.
मुख्यमंत्री दोन दिवस दरे या गावी आले असता त्यांनी मदन भोसले यांना वेळ देत विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. त्यावेळी विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधताना ही प्रमुख मागणी तातडीने मार्गी लावण्याची विनंती भोसले यांनी केली.
ते म्हणाले, १८ नोव्हेंबर २०२१ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सुरुर पोलादपूर मार्गास राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषीत करून त्याचा विकास करण्याची मागणी केली होती. ती मान्य होऊन या मार्गास राष्ट्रीय महामार्ग दर्जा मिळाला असून त्याचा विकास आराखडा तयार झाला आहे. मात्र या राष्ट्रीय महामार्गास क्रमांक मिळणे बाकी असून तो तातडीने मिळून विकास आराखड्यास मंजुरी मिळावी यासाठी केंद्र शासनाकडे विशेष पाठपुरावा होणे आवश्यक आहे. या रस्त्याच्या विकासामुळे वाई, पाचगणी, महाबळेश्वर परिसरातील उद्योग, पर्यटन व शेती विकासाला चालना मिळणार आहे.
तसेच, महाबळेश्वर तालुक्यातील मुख्य पिक असणाऱ्या स्ट्रॉबेरी पिकासाठी महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरी पिक संशोधन केंद्र व सादर केलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स बेरीज प्रस्तावास मान्यता द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.
स्ट्रॉबेरी महाबळेश्वर तालुक्यातील महत्वाचे कॅश क्रॉप असून याचबरोबर रास्पबेरी, मलबेरी, गुसबेरी या पिकांची लागवड या महाबळेश्वर तालुक्यामध्ये केली जाते.
सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर बेरिज या प्रस्तावास मान्यता मिळाल्यास ब्लॅकबेरी, कॅनबेरी आणि सोरचेरी याही पिकांची लागवड होऊ शकेल व महाबळेश्वर तालुक्यातील लोकांना आर्थिक उत्पन्नांचे नवीन साधन होवू शकेल.
स्ट्रॉबेरीच्या माध्यमातून २५० कोटींची इथे उलाढाल होते. इथला शेतकरी अल्पभूधारक असल्याने स्ट्रॉबेरीचे परदेशातून मागवावे लागणारे वाण न परवडणारी गोष्ट आहे. त्यामुळे इथेच जर स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र झाले तर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल, त्यांना त्यांच्या घामाचे चार पैसे अधिकचे मिळतील. सुदैवाने या पिकास भौगोलिक मानांकन मिळाले असून त्याचाही मोठा लाभ इथल्या शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी विक्रीकरिता होणार आहे.
यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वच विषय प्राधान्याने सोडवण्याची ग्वाही देत सुरुर पोलादपूर महामार्गाबाबत विशेष प्रधान्याने लक्ष देणार असल्याचे सांगितले.
यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा डॉ. सुरभी भोसले चव्हाण, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश भोसले, वाई तालुका अध्यक्ष रोहिदास पिसाळ, केतन भोसले, पंचायत समिती सदस्य दीपक ननावरे उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Fri 4th Nov 2022 06:38 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Fri 4th Nov 2022 06:38 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Fri 4th Nov 2022 06:38 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Fri 4th Nov 2022 06:38 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Fri 4th Nov 2022 06:38 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 4th Nov 2022 06:38 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 4th Nov 2022 06:38 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 4th Nov 2022 06:38 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 4th Nov 2022 06:38 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 4th Nov 2022 06:38 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 4th Nov 2022 06:38 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 4th Nov 2022 06:38 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 4th Nov 2022 06:38 am













