इंदिरा गांधींचे नेतृत्व खंबीर होते- मा. डॉ. सौ. मंजुषा इंगवले
बापू वाघ ( वाई )
- Tue 1st Nov 2022 10:48 am
- बातमी शेयर करा
पाकिस्तानला युद्धात पराभूत करुन बांगला देशाची निर्मिती करण्यात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या यशस्वी कारर्किर्दीत इंदिरा गांधींनी आपल्या देशात राजकीयच नव्हे तर सामाजिकही परिवर्तन घडवून आणले. भारताच्या राजकीय इतिहासात इंदिरा गांधी यांच्याकडे खंबीर नेतृत्व असणाऱ्या राजकर्त्या म्हणून पाहिले जाते असे प्रतिपादन वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. मंजुषा इंगवले यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालय, वाई येथे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त इंदिरा गांधी यांचा स्मतिदिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीबद्दल “आयर्न लेडी इंदिरा गांधी” या विषयांतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी सल्लागार समितीचे सदस्य कला विभागाचे उपप्राचार्य व इंग्रजी विभागप्रमुख प्रा. (डॉ.) सुनील सावंत, मराठी विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत कांबळे, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे, प्रकल्प अधिकारी डॉ. संग्राम थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. इंगवले म्हणाल्या, इंदिरा गांधी यांचा जन्म सधन कुटुंबात झाल्यामुळे त्यांचे बालपण बौद्धिक, वैचारिक, सांस्कृतिक व सामाजिक समृद्धीत गेले. त्यांच्यावर म. गांधींच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांचे वडील जवाहरलाल नेहरु स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असल्यामुळे त्यांना सातत्याने तुरूंगवास भोगावा लागत असे. नेहरू तुरूंगात असताना छोट्या इंदिरेस पत्र पाठवित असत. त्यामुळे त्या वैचारिकदृष्ट्या प्रबळ होत गेल्या. सदर पत्रव्यवहारामुळे त्यांना आधुनिक विज्ञान, प्राचीन इतिहास, भारतीय संस्कृती, धर्म, मानवी वंश, भाषा या गोष्टींचे ज्ञान होत गेले. त्यांच्या ठायी असणारा कणखरपणा, दुर्दम्य आत्मविश्वास, कर्तृत्वाची अफाट क्षमता, धाडसी निर्णय घेण्याची खुबी या सर्व गुणांमुळेच त्यांना ‘आयर्न लेडी’ असे संबोधले जाते.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे म्हणाले, महापुरुषांची जयंती व स्मृतीदिन साजरा करण्याच्या निमित्ताने त्यांनी अवलंबिलेली तत्त्वे, नियम, मूल्ये अंगिकारणे हे औचित्याचे ठरते. इंदिरा गांधी यांनी आपल्या देशाला आर्थिक व सामाजिक दुष्ट्या सक्षम केले. भारतीय स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतातील सर्व संस्थानांचे एकत्रीकरण करून एकसंध व अखंड भारत घडविण्यासाठी प्रयत्न केला. एन.एस.एस.च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अशा नैतिक मूल्यांचा अंगिकार करून स्वत:चे व्यक्तिमत्व समृद्ध करावे असे आवाहन प्राचार्यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. विद्यार्थिनी संतोषी काळे हिने राष्ट्रीय एकता दिवस शपथेचे वाचन केले. ऐश्वर्या शेलार, सायली शेलार, चैत्राली शेलार, स्नेहल वाडकर, नेहा शेलार व साक्षी चौधरी या विद्यार्थिनींनी एन.एस.एस. गीत गायीले. प्रीती नलावडे, सृष्टी गाडे, सायली राऊत व कीर्ती पिसाळ या विद्यार्थिंनींनी ‘राष्ट्रीय एकता दिन’ निमित्त बनविलेल्या पोस्टर्सचे मान्यवरांचे हस्ते अनावरण करण्यात आले.
प्रकल्प अधिकारी डॉ. अंबादास सकट यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. रुचिता सोंडकर व श्रावणी बगाडे यांनी सूत्रसंचालन केले तर अमृता कदम यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमानंतर राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ‘राष्ट्रीय एकता दौड’ आयोजित करण्यात आली होती. त्यात एन.एस.एसच्या स्वयंसेवकांनी वाई शहरातून दौड करत एकतेचा संदेश दिला.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल तायडे, निलम भोसले, स्वाती देशमाने, डॉ .अरुण सोनकांबळे, जयवंत खोत यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 1st Nov 2022 10:48 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 1st Nov 2022 10:48 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 1st Nov 2022 10:48 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 1st Nov 2022 10:48 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 1st Nov 2022 10:48 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 1st Nov 2022 10:48 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 1st Nov 2022 10:48 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 1st Nov 2022 10:48 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 1st Nov 2022 10:48 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 1st Nov 2022 10:48 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 1st Nov 2022 10:48 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 1st Nov 2022 10:48 am













