लेखी परिक्षेस पात्र उमेदारांकरीता सुचना: पोलीस अधीक्षक समीर शेख
Satara News Team
- Fri 31st Mar 2023 07:21 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा जिल्हा पोलीस भरती 2021 मधील लेखी परीक्षेस पात्र झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा दि.02/04/2023 रोजी 08.30 ते 10.00 या वेळेत छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा, यशवंतराव चव्हाण, महाविद्यालय, सातारा व धनंजयराव गाडगीळ महाविद्यालय, सातारा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. लेखी परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांनी नमुद परीक्षा केंद्रावर ०२ (दोन) तास पुर्वी पोहोचणे आवश्यक आहे. परीक्षेस येण्यास विलंब झाल्यास कोणतीही सबब विचारात घेतली जाणार नाही अशा उमेदवारांना परिक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार नाही तसेच त्यांना लेखी परिक्षेकरिता पुन्हा संधी देण्यात येणार नाही. सदर लेखी परीक्षेकसाठी महाआयटीकडून प्रवेशपत्र निर्गमित करण्यात आलेले असून policerecruitment2022. mahait.org या संकेतस्थळावरून डाउनलोड करून घ्यावे.
उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या भुलथापांना व आमिषाला बळी पडू नये. असे गैरप्रकार करताना कोणी आढळून असल्यास नियंत्रण कक्ष, सातारा यांचे ०२१६२-२३३८३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.
लेखी परिक्षा सुरु झाल्यानंतर ते परिक्षा कालावधी संपेपर्यंत कोणत्याही उमेदवारांस
कोणत्याही कारणासाठी परिक्षा केंद्राबाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.
इतर जिल्हयातून तसेच सातारा जिल्हयातील दुर्गम भागातून येणाऱ्या उमेदवारांची राहण्याची व्यवस्था छत्रपती शाहु क्रीडा संकूल, एस.टी. स्टँन्ड शेजारी, सातारा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. राहणेबाबत काही अडचणी आल्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक, विठ्ठल शेलार मोबाईल क्र. ९९२३६६६०६४ यांचेशी संपर्क साधावा.
उमेदवारांनी लेखी परिक्षेस येताना खालील प्रमाणे कागदपत्रे सोबत घेवून येणे आवश्यक आहे अन्यथा उमेदवारास परिक्षेस बसण्यास परवानगी देण्यात येणार नाही.
१.आवेदन अर्जाची प्रत
२. हॉल तिकीट प्रत
३. ओळखपत्राचा पुरावा म्हणून मुळ ( आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, मतदान ओळखपत्र ) यापैकी एक ओळखपत्र आवश्यक आहे. ४. दोन पासपोर्ट साईज फोटो
उमेदवारांनी सोबत डिजीटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक घडयाळ, कॅलक्युलेटर, ब्लूटुथ हेडफोन, कॅमेरा असे कोणत्याही प्रकारची साधने सोबत बाळगू नयेत. असे साहित्य आणल्यास ते परिक्षा केंद्रा बाहेर ठेवण्याची व त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधीत उमेदवाराची राहील. जर असे साहित्य लेखी परिक्षेवेळी सोबत बाळगल्याचे निदर्शनास आल्यास अथवा उमेदवार लेखी परिक्षेवेळी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन करताना आढळल्यास त्यास संपूर्ण भरती प्रक्रियेमधून अपात्र करण्यात येईल.
पोलीस अधीक्षक, सातारा.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 31st Mar 2023 07:21 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 31st Mar 2023 07:21 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 31st Mar 2023 07:21 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 31st Mar 2023 07:21 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 31st Mar 2023 07:21 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 31st Mar 2023 07:21 pm
संबंधित बातम्या
-
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 31st Mar 2023 07:21 pm
-
फलटणच्या विमानतळावरील पालखीतळाचे पहाणी न करताच विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची पावले पंढरीच्या दिशेने
- Fri 31st Mar 2023 07:21 pm
-
शेडगेवाडी पोलीस पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला...
- Fri 31st Mar 2023 07:21 pm
-
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 31st Mar 2023 07:21 pm
-
सुट्टीतही पटपडताळणी, चहा-पाणीची चर्चा; महाबळेश्वर तालुक्यात शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह
- Fri 31st Mar 2023 07:21 pm
-
खटावच्या विद्यमान तहसिलदारांनी खटावच्या जनतेला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून दिले?
- Fri 31st Mar 2023 07:21 pm
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Fri 31st Mar 2023 07:21 pm
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Fri 31st Mar 2023 07:21 pm











