आजचे राशी भविष्य ,पंचांग २५ ऑगस्ट २०२२ : गुरुपुष्य योगाचा संयोग, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घ्या

आजचा शुभ मुहूर्त २५ ऑगस्ट २०२२ : अभिजित मुहूर्त सकाळी ०४ वाजून २७ मिनिट ते ०५ वाजून ११ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी ०२ वाजून ३२ मिनिट ते ०३ वाजून २४ मिनिटांपर्यंत. निशीथ काल मध्यरात्री १२ वाजून ०१ मिनिट ते १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ०६ वाजून ३८ मिनिट ते ०७ वाजून ०२ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ०९ वाजून १० मिनिट ते १० वाजून ५७ मिनिटांपर्यंत

गुरुवार, २५ ऑगस्ट २०२२
{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }

दिनविशेष: शिवरात्री, गुरुपुष्यामृत सुर्योदयापासून सायं. ४-१५ पर्यंत.

वरीयान योग अर्धरात्रीनंतर ०१ वाजून ५६ मिनिटांपर्यंत. त्यानंतर परिधी योगाची सुरुवात. वणीज करण पुर्वान्ह १० वाजून ३८ मिनिटांपर्यंत. त्यानंतर शकुनि करणाची सुरुवात. चंद्र दिवस-रात्र कर्क राशीत संचार करेल.

मेष
आजच्या दिवशी काही कडू-गोड अनुभव येतील. काही प्रिय तर काही अप्रिय समाचार प्राप्त होतील. त्याचा गृहसौख्यावर परिणाम होऊ शकतो. शांत चित्त व स्थिर बुद्धीने आजचा दिवस व्यतीत करा.

वृषभ
आजच्या दिवशी कोणतेही अवास्तव धाडस करण्याचा प्रयत्न करू नका. कोणताही निर्णय योग्य विचाराअंती घ्या. आपल्या निर्णयात थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन घेतल्यास त्याचा निश्चित फायदा होईल.

मिथुन
आज घरातील शांतता भंग होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक राहील. कुटुंबातील सदस्यांच्या मताचा आदर करून विनाकारण मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या.

कर्क
आजच्या दिवशी एक नवा उत्साह, उमेद संचारेल. मनोबल वाढणाऱ्या घटना आपल्या आजूबाजूस घडतील. रोजच्या जीवनातील घटना गती घेऊन वेगवान होतील.

सिंह
आजचा दिवस काहीसा खडतर, कष्टप्रद जाऊ शकतो. दैनंदिन आयुष्यात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र विनाकारण कोणतेही दडपण घेऊ नका. शांततेने आजचा दिवस व्यतीत करा.

कन्या
आजच्या दिवशी आपल्या कार्याची दखल घेतली जाऊन आपण प्रशंसेस पात्र ठराल. आज आपल्या शब्दाला मान प्राप्त होईल आपले मत ग्राह्य धरले जाईल. त्यामुळे मनोबल चांगले राहील.

तुळ
आज आपल्या कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र कामाप्रती आपला उत्साह दांडगा असल्याने आपण त्या सर्व समस्यांवर समाधान शोधून काढाल.

वृश्चिक
आजच्या दिवशी पूर्वी घेतलेले कष्ट फलद्रूप होताना आढळतील. भाग्याची साथ लाभल्याने उत्कर्षाचा मार्ग प्रशस्त बनेल. अध्यात्मिकतेकडे तसेच धार्मिकतेकडे ओढा राहील.

धनु
आजच्या दिवशी एकाच वेळी निरनिराळ्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. एक प्रकारची निराशा मनात घर करून राहिलं. कलहसदृश्य परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करावा.

मकर
आज सुखी वैवाहिक जीवनाचा अनुभव घ्याल. आजच्या दिवशी जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. व्यवसाय संबंधित कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा.

कुंभ
आजच्या दिवशी स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष देणे अपरिहार्य राहील. काहीसा नैराश्य, उदासीनता, ताण-तणाव यांनी युक्त दिवस जाऊ शकतो. मनोबल काहीसे डळमळीत होऊ शकते.

मीन
आपल्या आवडत्या क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील. आपल्या कामाच्या स्वरूपात बदल घडून नवीन जबाबदारी मध्ये वाढ होऊ शकते. संततीशी योग्य संवाद साधणे गरजेचे राहील.

 

 

आजचा अशुभ मुहूर्त २५ ऑगस्ट २०२२ :

राहूकाळ द्पारी ०१ वाजून ३० मिनिट ते ०३ वाजेपर्यंत. सकाळी ०६ ते ०७ वाजून ३० मिनिटांपर्यंत यमगंड असेल. सकाळी ०९ ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंतगुलिक काळ असेल. दुर्मुहूर्त काळ दुपारी १० वाजून १४ मिनिट ते ११ वाजून ०५ मिनिटांपर्यंत. त्यानंतर ०३ वाजून २४ मिनिट ते ०४ वाजून १६ मिनिटांपर्यंत

 

   सौ . कांचन थिटे 
ज्योतिष, अंक वास्तू शास्त्र प्रवीण, विवाह (m.s)

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला