13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
बापू वाघ- Fri 15th Jul 2022 01:47 pm
- बातमी शेयर करा
सातारा दि.15 : सातारा मुख्यालय आणि जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात शनिवार दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.30 वा. राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी दिली आहे.
या लोकअदालतीमध्ये धनादेश न वटलेले प्रकरणे, वादपूर्व प्रकरणे, मोटार अपघात दावे, थकीत कर्जाची प्रकरणे, वैवाहिक वाद, थकीत ग्रामपंचायतीची मालमत्ता कर व पाणी बिलाची प्रकरणे इत्यादी प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी केले आहे.
लोकन्यायालयाचे फायदे :* खटल्यामध्ये साक्षी-पुरावा, उलट तपासणी, दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात, निकाल झटपट लागतो. लोकन्यायालयाच्या निवड्याविरुद्ध अपील नाही. एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते. लोकन्यायालयात निवाडा हा आपसात समजुतीने होत असल्याने ना कोणाचा जय होतो ना कोणाची हार होते त्यामुळे निवडा दोन्ही पक्षांना समाधान देतो. परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकात द्वेष वाढत नाही व कटुताही निर्माण होत नाही. कोर्टाच्या हुकूमनाम्याप्रमाणे लोकन्यायालयात होणारे निवाड्यांची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते. वेळ आणि पैसा दोन्हींचीही बचत होते व लोक न्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फीची रक्कम परत मिळते.
lokadalat
cort
escort
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 15th Jul 2022 01:47 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 15th Jul 2022 01:47 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 15th Jul 2022 01:47 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 15th Jul 2022 01:47 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 15th Jul 2022 01:47 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 15th Jul 2022 01:47 pm
संबंधित बातम्या
-
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 15th Jul 2022 01:47 pm
-
फलटणच्या विमानतळावरील पालखीतळाचे पहाणी न करताच विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची पावले पंढरीच्या दिशेने
- Fri 15th Jul 2022 01:47 pm
-
शेडगेवाडी पोलीस पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला...
- Fri 15th Jul 2022 01:47 pm
-
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 15th Jul 2022 01:47 pm
-
सुट्टीतही पटपडताळणी, चहा-पाणीची चर्चा; महाबळेश्वर तालुक्यात शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह
- Fri 15th Jul 2022 01:47 pm
-
खटावच्या विद्यमान तहसिलदारांनी खटावच्या जनतेला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून दिले?
- Fri 15th Jul 2022 01:47 pm
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Fri 15th Jul 2022 01:47 pm
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Fri 15th Jul 2022 01:47 pm











