राज्यस्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धेमध्ये पिंगळी बुद्रुकच्या मेरी माताला उपविजेतेपद !
Satara News Team
- Thu 21st Dec 2023 02:57 pm
- बातमी शेयर करा
पळशी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुल गारखेडा मैदानावर घेण्यात आलेल्या १४ वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धेमध्ये कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मेरी माता इंग्लिश मेडियम स्कूल पिंगळी बुद्रुकच्या १४ वर्षे खालील मुलांच्या संघाला उपविजेतेपद मिळाले.कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणारा मेरी माता इंग्लिश मेडीयम स्कूल पिंगळी बुद्रुक विरुध्द पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉ.कदम गुरुकुल इंदापूर यांच्या दरम्यान अंतिम सामना झाला.अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यामध्ये मेरी माता मुलांच्या संघाने उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन घडविले.मात्र,या सामन्यामध्ये त्यांना पराभवास सामोरे जावे लागले व उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.बिलासपुर (छत्तीसगड) या ठिकाणी होणाऱ्या ६५ व्या राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी या संघातील चिन्मय दादासो राऊत याची महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड झाली आहे.या यशाबद्दल सातारा जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर,सातारा जिल्हा बेसबॉल असोसिएशन चे सचिव ज्ञानेश काळे,मुख्याध्यापक फादर जिनो थॉमस,शाळेचे मॅनेजर फादर सचिन,सर्व पालक प्रतिनिधी,शिक्षक शिक्षकेतर सर्व कर्मचारी यांनी उपविजेत्या संघाचे अभिनंदन केले तसेच,चिन्मय यास राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.या खेळाडूंना क्रीडा शिक्षक सुरेश खराडे,बेसबॉल प्रशिक्षक गणेश गोरे व विष्णु काळेल यांचे मार्गदर्शन लाभले.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 21st Dec 2023 02:57 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 21st Dec 2023 02:57 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 21st Dec 2023 02:57 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 21st Dec 2023 02:57 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 21st Dec 2023 02:57 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 21st Dec 2023 02:57 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 21st Dec 2023 02:57 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 21st Dec 2023 02:57 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 21st Dec 2023 02:57 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 21st Dec 2023 02:57 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 21st Dec 2023 02:57 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 21st Dec 2023 02:57 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 21st Dec 2023 02:57 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 21st Dec 2023 02:57 pm













