जावळवाडीत, शिवीगाळ दमदाटी करून जखमी करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल.

देशमुखनगर :  जावळवाडी ता. सातारा येथे एकजणाने दारू पिऊन दोघांना  शिविगाळ दमदाटी करुन दगडाने जखमी केल्याची तक्रार बोरगांव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. रणजीत विश्वासराव मोहिते रा. जावळवाडी ता. सातारा असे तक्रार दाखल झालेल्या इसमाचे नांव आहे. 
     पोलीस स्टेशनमधुन मिळालेल्या माहीती नुसार  काल जावळवाडी येथे तक्रारदार व त्यांचा पुतण्या रोहीत हे रस्त्यावर चर्चा करत उभे असताना रणजीत त्यांच्यासमोर असलेल्या बाकाची नासधुस करत होता.  त्यानंतर त्याने या दोघांना जवळ येऊन शिवीगाळ व दमदाटी करत दगड फेकुन मारत जखमी केले. अरविंद आनंदराव जाधव रा. जावळवाडी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असुन सहाय्यक फौजदार फिरोज शेख पुढील तपास करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला