शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीमध्ये सोसायटीचा सिंहाचा वाटा आ. शिवेंद्रसिंहराजे;
निगडी वंदन येथे सोसायटीच्या इमारतीचे उद्घाटनSatara News Team
- Mon 4th Sep 2023 04:40 pm
- बातमी शेयर करा
सातारा- आपल्या कृषिप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी विकास सेवा सोसायट्या निर्माण झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून गाव पातळीवरील विकास सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होत आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीमध्ये सोसायटीचा सिंहाचा वाटा असतो, असे प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
निगडी वंदन ता. सातारा येथील विकास सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी कराड उत्तरचे भाजपा नेते, माण- खटाव ऍग्रो कारखान्याचे चेअरमन मनोज घोरपडे, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन रामचंद्र भाऊ जगदाळे, माजी व्हाईस चेअरमन राजू पाटील, माजी संचालक उत्तम घाडगे, रमेश कणसे, सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, उपसभापती मधुकर पवार, संचालक धनाजी जाधव, जिल्हा सहकारी बोर्डाचे माजी चेअरमन धनंजय शेडगे, पंचायत समितीचे माजी सदस्य विलासराव शेडगे, खरेदी विक्री संघाचे संचालक देवानंद पिसाळ, माण- खटाव ऍग्रोचे संचालक कृष्णात शेडगे, नितीन कणसे, विघ्नहर्ता विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर कणसे, संदीप मांडवे, विलास मांडवे, सोसायटीचे चेअरमन अण्णासो शेळके, सरपंच संतोष मांडवे, जयवंत जाधव, प्रदीप यादव, संभाजी मांडवे आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ग्रामीण भागातील अर्थकारणामध्ये विकास सेवा सोसायटयांचा महत्वाचा वाटा असतो. सोसायटयांनी आपला सभासद शेतकरी आर्थिक सक्षम करण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधून सोसायटीचा नावलौकिक वाढवण्यासाठी संचालक मंडळाने तत्पर राहिले पाहिजे. गट- तट न मानता सोसायटीने सर्व सभासदांना आर्थिक सक्षम करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले. कार्यक्रमास अंगापूर पंचक्रोशीतील विविध पदाधिकारी, निगडी गावचे ग्रामस्थ आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 4th Sep 2023 04:40 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 4th Sep 2023 04:40 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Mon 4th Sep 2023 04:40 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Mon 4th Sep 2023 04:40 pm
संबंधित बातम्या
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 4th Sep 2023 04:40 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Mon 4th Sep 2023 04:40 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Mon 4th Sep 2023 04:40 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Mon 4th Sep 2023 04:40 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Mon 4th Sep 2023 04:40 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Mon 4th Sep 2023 04:40 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Mon 4th Sep 2023 04:40 pm
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Mon 4th Sep 2023 04:40 pm












