पाचगणीत अनधिकृतपणे फ्लॅटचा ताबा घेणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल
Satara News Team
- Thu 23rd Feb 2023 11:48 am
- बातमी शेयर करा
पांचगणी : पांचगणी येथे फ्लॅटचा ताबा घेण्याचे उद्देशाने संगनमताने अनधिकारपणे घरात घुसले बाबत पांचगणी पोलीस ठाण्यात चौघाविरोधात गुन्हा दाखल झाला असून हे सर्वजण फरार असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत.
याबाबत पांचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की पांचगणीतील जुन्या पोलीस ठाण्यासमोर जैन मंदिर रोड वर असणाऱ्या ओशो अपार्टमेंट मधील फ्लॅट नंबर 203,204 मध्ये
अन्वर हुसेन मोहम्मद हुसेन शेख (वय 52 वर्ष ) हे आपली पत्नी व मुलीसोबत राहत असून दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते ३ वाजताचे सुमारास स्मृति सिराज गोवानी( भट), भारती जोधिया , हुसेन माला,हितेश भंडारी सर्वजण राहणार पांचगणी अशा चार जणांनी फ्लॅट ताब्यात घेण्याचे उद्देशाने घराचे कडी कोयंडा कुलूप तोडून अनधिकार पणे घरात घुसून माझ्या संमती शिवाय माझे घरातील असणाऱ्या वस्तूची नासधूस करून इतरत्र टाकून लॅपटॉप ,टॅब ,सरकारी पत्र व्यवहारांची कागदपत्रे, युनिव्हर्सिटीचे व जमिनीचे मूळ कागदपत्रे वरील चौघांनी चोरून नेली असल्याचे फिर्यादीत शेख यांनी दिली आहे.
या संशयित चौघांविरुद्ध पोलिसांनी भा.द.वि.स कलम ४४८,४५४,३८०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलिस या चौघांच्या शोधात आहेत. अधिक तपास पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने व त्यांचे सहकारी करीत आहेत.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 23rd Feb 2023 11:48 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 23rd Feb 2023 11:48 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 23rd Feb 2023 11:48 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 23rd Feb 2023 11:48 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 23rd Feb 2023 11:48 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 23rd Feb 2023 11:48 am
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Thu 23rd Feb 2023 11:48 am
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 23rd Feb 2023 11:48 am
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Thu 23rd Feb 2023 11:48 am
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Thu 23rd Feb 2023 11:48 am
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 23rd Feb 2023 11:48 am
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Thu 23rd Feb 2023 11:48 am
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Thu 23rd Feb 2023 11:48 am











