मांढरदेव परिसरातील भाविकांनी प्लॅस्टिक कचरा कचरा संकलन केंद्रामध्येच जमा करावा : यात्रेच्या पार्श्वभूमीवर आवाहन
कचरा संकलन केंद्राचे उद्घाटनSatara News Team
- Wed 4th Jan 2023 03:02 pm
- बातमी शेयर करा
सातारा : मांढरदेव, ता.वाई येथील काळुबाई देवीची यात्रा गुरुवार दि.५ ते शनिवार दि.७ अखेर संपन्न होत असून यात्रा काळात मांढरदेव परिसरात ग्रामपंचायतीमार्फत ठिकठिकाणी कचरा संकलन केंद्रे उभारण्यात आलेली आहेत.तेव्हा भाविकांनी प्लास्टिकचा कचरा इतरत्र न फेकता कचरा संकलन केंद्रांमध्येच जमा करावा.असे आवाहन नायब तहसीलदार वैशाली जायगुडे यांनी केले.
यावेळी पंचायत समितीचे गटविकासाधिकारी नारायण घोलप, सरपंच सीमा मांढरे आदी मान्यवर उपस्थित होते. मांढरदेव येथील कचरा संकलन केंद्राचे नुकतेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले होते.दरवर्षी काळुबाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात भरते. या यात्रेसाठी महाराष्ट्रसह परराज्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या सुमारे पाच ते सात लाख इतकी असते. यात्रा कालावधीत येणारे भाविक जेवणाच्या पत्रावळ्या व इतर प्लास्टिकचे साहित्य गडावर व इतरत्र अस्ताव्यस्तपणे फेकून देतात. त्यामुळे यात्रा संपन्न झाल्यानंतर सगळीकडे कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले दिसते. यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतीने यावर्षीपासून कचरा संकलन केंद्रे १० ठिकाणी निर्माण केलेली आहेत. अगोदर पडलेला कचरा सदर कचरा संकलन केंद्रांमध्येच साठवलेला आहे. तो साठवलेला कचरा ट्रॅक्टरद्वारे वाई येथील नगरपालिका कचरा डेपोमध्ये जमा करण्याची तरतूद केलेली आहे. तरी येणाऱ्या भाविकांनी प्लास्टिकचा कचरा कचरा संकलन केंद्रामध्ये जमा करून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. असे आवाहनही करण्यात आले आहे. कचरा संकलन उद्घाटनाच्या वेळी पाणीपुरवठा अभियंता म्हात्रे, कनिष्ठ अभियंता सागर कारंडे, विस्ताराधिकारी राहुल हजारे, रुपेश मोरे, उपसरपंच बापूराव धायगुडे, ग्रामपंचायत सदस्य विलास मांढरे, ग्यानबा ढेबे, काळूराम पार्टे, ललिता जाधव, आश्विनी ढेबे, मंदा काशीद, शालन कोचळे, ग्रामसेवक शहाजी बोभाटे, ग्रामपंचायत कर्मचारी लहू मांढरे, सागर मांढरे, रामदास उंबरकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Wed 4th Jan 2023 03:02 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Wed 4th Jan 2023 03:02 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 4th Jan 2023 03:02 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 4th Jan 2023 03:02 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 4th Jan 2023 03:02 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Wed 4th Jan 2023 03:02 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 4th Jan 2023 03:02 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 4th Jan 2023 03:02 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 4th Jan 2023 03:02 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 4th Jan 2023 03:02 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 4th Jan 2023 03:02 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 4th Jan 2023 03:02 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 4th Jan 2023 03:02 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 4th Jan 2023 03:02 pm













