नडशी कॉलनीत आढळली एक बेवारस बॅग
Satara News Team
- Thu 4th Jan 2024 04:19 pm
- बातमी शेयर करा
कराड : कराड तालुक्यातील नडशी कॉलनीयेथे शिरवडे स्टेशन रस्त्यालगत बुधवारी सकाळच्या सुमारास दुचाकीवरुन आलेला एक जण एक बॅग ठेवून कराडच्या दिशेने निघून गेला. ही गोष्ट स्थानिकांच्या निदर्शनास आल्याने परिसरात भीती पसरली होती.
संशयास्पद आढळून आलेल्या या बॅगेत नेमकं काय आहे? या भीतीने स्थानिक नागरिकांनी याची माहिती तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरोटे यांनी पोलीस कर्मचारी डी. आर. काळे, नीलेश विभूते, संदेश दीक्षित, पोलीस पाटील वैशाली गायकवाड यांना घटनास्थळी पाठवले.
मात्र, पोलिसांनी तपासणी केली असता बॅगमध्ये किरकोळ साहित्य सापडले. आणि पोलीस आणि स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
बॅगेत आढळल्या ‘या ‘ वस्तू
ज्यावेळी तळबीड पोलिसांनी बॅग असलेल्या ठिकाणी भेट दिली. त्यावेळी त्यांनी बॅग उघडुन आतमध्ये बघितले असता त्यामध्ये जेवणाचा डबा, मोजणी टेप असे साहित्य सापडले. त्यानंतर बॅग ही कोणी कामगाराने ठेवली असावी, असे दिसून आले.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 4th Jan 2024 04:19 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 4th Jan 2024 04:19 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 4th Jan 2024 04:19 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 4th Jan 2024 04:19 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 4th Jan 2024 04:19 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 4th Jan 2024 04:19 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 4th Jan 2024 04:19 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 4th Jan 2024 04:19 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 4th Jan 2024 04:19 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 4th Jan 2024 04:19 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 4th Jan 2024 04:19 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 4th Jan 2024 04:19 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 4th Jan 2024 04:19 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 4th Jan 2024 04:19 pm













