कासवंडचा सोहम जाधव ठरला ६० मीटरचा चॅंपियन
Satara News Team
- Thu 8th Feb 2024 11:19 am
- बातमी शेयर करा
महाबळेश्वर : मंगळवार दि.०६/०२/२०२४ रोजी सातारा जिल्हा परिषद सातारा आयोजित स्व.यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धेमध्ये महाबळेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना जि.प.प्राथ.शाळा कासवंडचा विद्यार्थी कु.सोहम सागर जाधव याने ६० मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवला आहे. गतवर्षी अपयश मिळाल्याने खचून न जाता जिद्दीने पुन्हा तयारी करून मार्गदर्शक शिक्षक श्री.तानाजी नगरे सर आणि विजेता कु. सोहम जाधव यांनी यशाचे नियोजन केले आणि गतवर्षी हातून निसटलेला विजय मिळवण्यात यश आणले.
तालुक्याचे प्रेरणास्थान असलेेले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गटशिक्षणाधिकारी श्री.आनंदजी पळसे साहेब यांनी सोहमचे कौतुक केले आहे तसेच तालुक्यातील सर्वच शिक्षकांनीही विजयाबद्दल कौतुक केले आहे. शाळेचे मुख्याध्यापक श्री.भाऊसाहेब दानवले गुरूजी यांनी आपला महाबळेश्वर जसा उंचीवर आहे तसाच खेळातही उंचीवर आहे हे आजच्या यशातून दिसून आले असे मत व्यक्त केले.
सोहमचे तसेच शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे त्याबद्दल सोहमचे पालक सागर जाधव यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.
स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Thu 8th Feb 2024 11:19 am
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Thu 8th Feb 2024 11:19 am
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Thu 8th Feb 2024 11:19 am
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Thu 8th Feb 2024 11:19 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 8th Feb 2024 11:19 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 8th Feb 2024 11:19 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 8th Feb 2024 11:19 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 8th Feb 2024 11:19 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 8th Feb 2024 11:19 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 8th Feb 2024 11:19 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 8th Feb 2024 11:19 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 8th Feb 2024 11:19 am













