विनापरवाना रॅली काढून दहशत माजवल्या बद्दल 21 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Satara News Team
- Thu 22nd Aug 2024 09:58 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा शहरामध्ये विनापरवाना स्पीकर लावून हातात दांडक घेऊन दहशत माजवने रॅली काढून जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहरातील 21 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा शहरातील व्यापार्यांना जबरदस्तीने दुकाने बंद करण्यासाठी दमदाटी केल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
यामध्ये दिलीप जगताप, पूजा बनसोडे, प्रतीक गायकवाड, संदीप कांबळे, वैभव गायकवाड, नितीन चव्हाण, बाळकृष्ण देसाई, पांडुरंग माने, विनोद ओव्हाळ, दिलीप सावंत, शरद गाडे, अक्षय कांबळे, विश्वास सावंत व इतरांवर जबरदस्तीने हातात दांडके घेऊन दहशत माजवून दुकाने बंद केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी जबाबदार धरले आहे.
21 ऑगस्ट रोजी सातारा शहरातील शाहू चौक, मोती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय यादरम्यान सकाळी साडे अकरा ते दोन या दरम्यान संबंधितांनी विनापरवाना स्पीकर लावून रॅली काढली. तसेच बाजारपेठेतील दुकानदारांना जबरदस्तीने हातात दांडके घेऊन दुकाने बंद करायला लावली. त्यामुळे जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे या प्रकरणात उल्लंघन झाले. सातारा शहर पोलिसांनी कलम 189, 119 ( 2) 190, 223, व 351 दोन प्रमाणे सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये संबंधितांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. के. जायपत्रे अधिक तपास करत आहेत.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 22nd Aug 2024 09:58 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 22nd Aug 2024 09:58 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 22nd Aug 2024 09:58 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 22nd Aug 2024 09:58 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 22nd Aug 2024 09:58 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 22nd Aug 2024 09:58 pm
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Thu 22nd Aug 2024 09:58 pm
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 22nd Aug 2024 09:58 pm
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Thu 22nd Aug 2024 09:58 pm
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Thu 22nd Aug 2024 09:58 pm
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 22nd Aug 2024 09:58 pm
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Thu 22nd Aug 2024 09:58 pm
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Thu 22nd Aug 2024 09:58 pm











