भाऊसाहेब महाराज व पी.डी.पाटीलसाहेब यांनी केलेली कामे ही नवीन पिढीला दिशादर्शक आणि मार्गदर्शक - आमदार बाळासाहेब पाटील.

देशमुखनगर : सातारा तालुक्याचे भाग्यविधाते स्व.श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले व कराड उत्तरचे भाग्यविधाते आदरणीय स्व.पी.डी.पाटीलसाहेब यांनी सहकार क्षेत्रशिवाय सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य हे नवीन पिढीला दिशादर्शक व मार्गदर्शक ठरतील असे मत आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

ते मौजे देशमुखनगर ग्रामपंचायत कार्यालय येथे जेष्ठ स्वा. सेनानी बाबुरावजी घोरपडे चॅरीटेबल ट्रस्ट नांदगाव मा.आ.श्री.बाळासाहेब पाटील युवक संघटना व श्री. छ. आ. बाबाराजे युवा मंच जि.प.वर्षे गटकेंद्र देशमुखनगर यांचे वतीने बसविण्यात येणारे "सहकार महर्षि" स्व.श्री.छ. अभयसिंहराजे भोसले (भाऊसाहेब महाराज) य स्व. आदरणीय पी.डी. पाटील साहेब यांचा संपूर्ण जिवन परिचय असलेले भव्य असे तैलचित्र अनावरण  प्रसंगी बोलत होते.

यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, रामभाऊ जगदाळे, यशवंत साळुंखे, ऍड.लालासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की, तैल चित्राच्या अनावर सोहळ्यानिमित्त आज या ठिकाणी आदरणीय स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले आणि स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब या दोघांनी केलेल्या कामाचे महत्त्व लक्षात घेता देशमुखनगर ग्रामपंचायतीने तैलचित्राचे अनावरण केले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो,  अनेक संघर्षातून या दोन्ही नेत्यांनी सातारा जिल्ह्यात विकासाची गंगा आणली आजच्या या कार्यक्रमामुळे त्यांच्या कामाचे महत्त्व या संपूर्ण परिसराला माहिती होण्यास मदत होईल. सहकार क्षेत्रातील असणाऱ्या अनेक अडचणी मात करून अजिंक्यतारा आणि सह्याद्रि कारखाने शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील असतील.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले सहकार महर्षी अभयसिंहराजे  भोसले आणि पी डी पाटील साहेब यांच्या माध्यमातून सातारा तालुक्यातील अपशिंगे आणि नागठाणे  भागाचा सर्वांगीण विकास मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत झालेली आहे. या दोन नेत्यांच्या माध्यमातून इथल्या लोकांचे आर्थिक, सामाजिक परिस्थिती  सुधारण्यासाठी या दोघांनी प्रयत्न केले या दोघांच्या माध्यमातून सह्याद्रि आणि अजिंक्यतारा सारखे सहकारी तत्वावर चालणारे कारखाने उभे करण्यात आले. या दोघांनाही कधीही वैयक्तिक विचार न करता समाजाचा विचार करून आपली माणस मोठी कशी होतील याचाच विचार करून नेहमी विकास कामांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला.अजिंक्यतारा आणि सह्याद्री साखर कारखाने नेहमी शेतकऱ्यांच्या जीवनशैलीत भर टाकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि इथून पुढच्या काळात ते करत राहतील त्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य असणे गरजेचे आहे.

याप्रसंगी प्रकाश घोरपडे, मनोहर घाडगे, कांतीलाल पाटील, सुनील निकम, संजय कुंभार, विश्वास शेडगे, सचिन देशमुख, अजित साळुंखे, अनिल घोरपडे, उदय देशमुख, प्रमोद पवार, विकास घोरपडे, संतोष देशमुख, प्रमोद चव्हाण, विजय घोरपडे, अशोक पिसाळ, विठ्ठल माने, अनिल साळुंखे, राहुल डांगे, विलास घाडगे, जगन्नाथ घाडगे, रामभाऊ घोरपडे, सोपान देशमुख, तुषार घाडगे, बजरंग जाधव, सौ.सुषमाराजे घोरपडे, सौ.शिला सावंत, सौ.कमल देशमुख, सौ.नूतन देशमुख, सौ.ज्योती देशमुख व  पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला