शाळा सोबतींचे तुटले बंध २२ वर्षांनी जुळले

'न्यु इंग्लिश स्कुल'च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन जुन्या आठवणींनी गहिवरले

वाई : आनंदलेले चेहरे, जुन्या आठवणींचा गहिवर, त्यावेळी झालेल्या रुसव्या फुगव्याचा उडून गेलेला रंग, त्यावेळच्या खोड्या आठवीत हास्य विनोदाला आलेले उधाण अशा आनंदी वातावरणात हुमगाव, ता.जावलीच्या माजी विदयार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला.
       तब्बल २२ वर्षांनी एकत्र आलेल्या या शाळा सोबतींनी 'वो दिन भी क्या दिन थे' म्हणत शालेय जीवनातील ते आनंदी दिवस पुन्हा एकदा आठवणीत जागवले.
     विशेष म्हणजे हा स्नेहमेळावा गुरू शिष्यांचा एकत्रितपणे आयोजित करण्यात आला आणि हेच याचे वैशिष्ट्य ठरले.
       यावेळी माजी विद्यार्थ्यांनी गुरूवर्य दादासाहेब शिंदे, सुर्यकांत शिर्के सर,अंजली शिर्के मॅडम,डी बी जाधव सर,यु डी भोसले सर, आणि  एस डी शिंदे , यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करत न्यु इंग्लिश स्कुलमुळे आमच्या आयुष्याचा पाया मजबूत झाला असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
      कार्यक्रमस्थळी सर्व शिक्षकांचे स्वागत पुप्षवर्षावात केले. त्यामुळे सर्व शिक्षक भावूक झाले होते.
     इथं कोणी मोठा नव्हता की कोणी छोटा  नव्हता, एकञ येण्यामागे निमित्त होते ते न्यु इंग्लिश स्कुलच्या प्रागंणात जीवलग मिञ-मैञीणी, गुरूजनांच्या  आपुलकीच्या नात्यातील जुन्या आठवणींचा स्नेहमेळावा, तब्बल २२वर्षांनी एकञ येवुन गाठीशी बांधल्या त्या शालेय जीवनातील सोनेरी क्षणांच्या आठवणी.
दरम्यान सर्वच शिक्षकांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना त्यांचा दाटलेला कंठ पाहुन विद्यार्थीही गहिवरले. त्यांच्या डबडबलेल्या डोळ्यातुन अश्रुधारा वाहू लागल्या. या भावनिक क्षणांचे सर्व साक्षीदार झाले.
     स्नेहमेळावा उत्साहात व्हावा यासाठी उद्योजक कमलेश भालेघरे, अतुल हिगंमिरे,  सचिन शिर्केे,अविनाश परामणे, वैजयंती देशपांडे, अश्विनी परामणे, कुलदीप नलावडे, दिपक परामणे, पल्लवी तरडे, साधना गुजर, स्वाती गुरव, अश्विन गोळे, विशाल पवार यांनी सहकार्य केले. सुञसंचालन वैजयंती देशपांडे तर आभार गितांजली देशपांडे यांनी मानले. या वेळी आजी-माजी विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला