क्रेन चोरटा मल्हारपेठ पोलीसांच्या ताब्यात

पाटण : आज सकाळी ०८.३० वा. चे सुमारास मल्हारपेठ पोलीस ठाणे हद्दीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले सो, पोलीस उपनिरीक्षक सुनिता शेळके सो. सहा फौजदार प्रदिप साळवी, पो.हवा. संजय मोरे, होम प्रदिप निकम पेट्रोलींग ड्यूटी करत असताना मौजे मरळी ता. पाटण गावचे हदीमध्ये मरळी ते ढेबेवाडी जाणारे रोडवर सुतारमळा येथे टोइंग क्रेन क्र.एम.एच.०९ सी.ए.६३०६ ही उभी असल्याचे दिसली असता तेथे जावुन चौकशी केली संशयित आरोपीच्या हालचाली संशयास्पद दिसलेने त्यास जागीच पकडुन त्याचेकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला  त्यानंतर सदर संशयित आरोपीकडे अधिक चौकशी करता पोलीस ठाणेस आलेनंतर त्याचे ताब्यातील टोइंग क्रेन नं. एम.एच.०९ सी.ए.६३०६ किंमत अंदाजे ७०००००/-रू (सात लाख) किमतीची क्रेन कराड शहर येथुन चोरी केली असल्याचे कबुली दिली.आरोपीचे नाव रविंद्र विठ्ठल चोरगे असून  वय २१ वर्षे, रा. चोरगेवाडी (कुंभारगाव), ता. पाटण, जि. सातारा

सदर टोइंग क्रेन ची कराड शहर पोलीस ठाणे कडुन अधिक माहिती घेतली असता कराड शहर पोलीस ठाणे गुन्हां रजि.नं. १२८७/२०२४ भा.न्या. संहिता. कलम.३०३ (२) दि.१९/०९/२०२४ रोजी गुन्हां दाखल झालेचे निष्पन्न झालेने सदर आरोपी व टोइंग क्रेन ही पुढील कारवाई करता कराड शहर पोलीसांचे ताब्यात दिले आहे.
ही कारवाई मा. समीर शेख पोलीस अधिक्षक सो सातारा, मा. श्रीमती वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधिक्षक सो, सातारा.मा.विजय पाटील पोलीस उपअधिक्षक सो, पाटण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले सो. पोलीस उपनिरीक्षक सुनिता शेळके, सहा फौजदार प्रदिप साळवी, पो. हवा. संजय मोरे, होम .प्रदिप निकम यांनी केली. 

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला