वाई हत्याकांड प्रकरण; माफीची साक्षीदार ज्योती मांढरेला जामीन मंजूर
Satara News Team
- Fri 30th Sep 2022 06:18 am
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा जिल्ह्यासह देशात गाजलेल्या तथाकथित डॉ. संतोष पोळ याने केलेल्या वाई हत्याकांड प्रकरणातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिला सातारा जिल्हा न्यायालयाने १ वर्षासाठी जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय उपचारासाठी ती तब्बल सहा वर्षांनंतर मोठ्या कालावधीसाठी बाहेर येणार आहे.
डॉ. संतोष पोळ या सीरियल किलरने ६ जणांचे खून करून ते मृतदेह त्याच्या फार्म हाऊसमध्ये पुरले होते. यातील एका खुनात ज्योती मांढरे हिचा सहभाग आढळला. सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने २०१६ साली म्हणजे सहा वर्षापूर्वी हे हत्याकांड उजेडात आणल्यानंर वाईसह सातारा जिल्हा हादरून गेला होता.
वाई हत्याकांडाची सुनावणी सातारा जिल्हा न्यायालयात सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून डॉ. संतोष पोळ याच्या लहरीपणामुळे या खटल्याची सुनावणी संथ गतीने सुरू आहे. अशातच ज्योती मांढरे हिच्या वतीने न्यायालयात तिला वैद्यकीय उपचारासाठी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला असता न्यायालयाने त्याला अटी, शर्तीवर मंजुरी दिली आहे.
crime
wai
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 30th Sep 2022 06:18 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 30th Sep 2022 06:18 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 30th Sep 2022 06:18 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 30th Sep 2022 06:18 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 30th Sep 2022 06:18 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 30th Sep 2022 06:18 am
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Fri 30th Sep 2022 06:18 am
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 30th Sep 2022 06:18 am
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Fri 30th Sep 2022 06:18 am
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Fri 30th Sep 2022 06:18 am
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 30th Sep 2022 06:18 am
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Fri 30th Sep 2022 06:18 am
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Fri 30th Sep 2022 06:18 am











