रोड रॉबरीच्या तयारीत असलेले रेकॉर्डवरील ५ जण ताब्यात; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईSatara News Team
- Fri 12th Jan 2024 04:07 pm
- बातमी शेयर करा
सातारा : रोड रॉबरी करण्याच्या तयारीत असणाऱ्या पोलीस रेकॉर्डवरील ५ आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडून २ देशी बनावटीची पिस्टल, ४ जिवंत काडतुसे, २ लोखंडी सुरे व मोबाईल हॅन्डसेट असा ३ लाख ३ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल सातारा स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी दिलेल्या आदेशानुसार सातारा जिल्हयात दोन दिवस कोंबींग ऑपरेशन व नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली होती. त्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व अमित पाटील यांचे अधिपत्याखाली पथके तयार करुन त्यांना गुन्हे प्रतिबंध अनुशंगाने सातारा शहरात पेट्रोलिंग करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
सदर पथके सातारा शहरात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ चे खिंडवाडी ते शिवराज फाटा जाणारे सर्व्हिसरोडवरील वनविभागाचे झाडीमध्ये काही इसम हत्यारानिशी जमले असून ते रोड रॉबरी करण्याच्या तयारीमध्ये आहेत, अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पेट्रालिंग करणाऱ्या पथकास नमुद ठिकाणी जावून कार्यवाही करण्याचे आदेश दिले. पथके तात्काळ त्या ठिकाणी रवाना झाली, नमुद इसमांना पोलीसांची चाहूल लागताच ते अंधाराचा व झाडाझुडूपांचा फायदा घेवून पळून जावू लागले. पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी नमुद इसमांचा अंधारात झाडाझुडूपात पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले असता सदरचे संशयित पोलीस रेकॉर्डवरील आरोपी अमिर सलीम शेख (रा. मु. पो. वनवासवाडी ता. जि. सातारा), अमिर इम्तीयाज मुजावर (रा.गोरखपुर पिरवाडी ता. जि. सातारा), अलिम नजीर शेख (रा. गोरखपुर पिरवाडी ता.जि.सातारा), यश सुभाष साळूंखे (रा.आय. टी. आय रोड मोळाचा ओढा सातारा), अभिषेक उर्फ अबू राजू भिसे (रा. काळे वस्ती निकीबंटस हॉटेलचे पाठीमागे मोळाचा ओढा सातारा) हे असल्याचे आढळून आले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीमध्ये २ देशी बनावटीची पिस्टल, ४ जिवंत काडतुसे, २ सुरे व ६ मोबाईल हॅन्डसेट असा एकूण ३ लाख ३ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. सादर संशयितांना या ठिकाणी कशासाठी आला होता हे विचारले असता त्यांनी रोड रॉबरी करण्याकरीता येथे आलो असल्याचे सांगीतल्याने त्यांचे विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, अमित पाटील, विश्वास शिंगाडे, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, अरुण पाटील, अमित माने, स्वप्नील कुंभार, अमित सपकाळ, ओंकार यादव, मोहन पवार, विक्रम पिसाळ, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, वैभव सावंत, मयुर देशमुख, शिवाजी गुरव यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांनी अभिनंदन केलेले आहे.
satarapolice
crime
robbery
sataracrime
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 12th Jan 2024 04:07 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 12th Jan 2024 04:07 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 12th Jan 2024 04:07 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 12th Jan 2024 04:07 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 12th Jan 2024 04:07 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 12th Jan 2024 04:07 pm
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Fri 12th Jan 2024 04:07 pm
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 12th Jan 2024 04:07 pm
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Fri 12th Jan 2024 04:07 pm
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Fri 12th Jan 2024 04:07 pm
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 12th Jan 2024 04:07 pm
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Fri 12th Jan 2024 04:07 pm
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Fri 12th Jan 2024 04:07 pm











