चोरीला गेलेले व गहाळ झालेले २० मोबाईल व ०१ टॅब यांचा शोध घेऊन तक्रारदार यांना वाई पोलिसानी केले परत
बापू वाघ - Sat 30th Aug 2025 01:17 pm
- बातमी शेयर करा
वाई : वाई शहर ही सातारा जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ आहे त्यानुसार वाई शहरास एक मोठी ओळख आहे. वाई शहरात आजुबाजुच्या गावातुन हजारोचे संख्येने लोक नोकरी रोजगार व शिक्षण व इतर बाजारपेठेमध्ये खरेदी करण्यासाठी वाई शहरात येत जात असतात त्यावेळी प्रवासात बाजारपेठेत व इतर ठिकाणी मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक आहे.या मोबाईल तक्रारीबाबत गांभीर्याने लक्ष घालण्याच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज व पो.कॉ विशाल शिंदे यांस योग्य ते मार्गदर्शन करुन सदरचे गहाळ झालेले मोबाईलचा तात्त्काळ छडा लावण्याबाबत मा.श्री जितेंद्र शहाणे पोलीस निरीक्षक साो प्रभारी अधिकारी वाई यांनी आदेश केला दिलेल्या सूचनेनुसार चोरीला व घायाळ झालेले मोबाईलचा तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गुन्हेप्रकटीकरण शाखेने महाराष्ट्र राज्याचे विविध भागामधुन तसेच इतर राज्यातुन मोबाईल परत मिळवत एकूण वीस मोबाईल व एक टॅब असा एकूण ०४ लाख २० हजार रुपये किंमतीचे शोध घेऊन गहाळ झालेले मोबाईल तक्रारदार यांना परत करण्यात आले जाने २०२४ पासुन एकुण ३०० विविध कंपन्यांचे नामांकित मोबाईल वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेने तक्रारदार यांना परत केले आहेत.यामुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत प्रशंसनीय भावना व्यक्त करण्यात येत आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक साो श्री. तुषार दोषी, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती वैशाली कडुकर मॅडम मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सो वाई विभाग श्री. बाळासाहेब भालचिम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र शहाणे तपासपथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पो.कॉ विशाल शिंदे, पो.कॉ हेमंत शिंदे, पो.कॉ नितीन कदम,पो.कॉ श्रावण राठोड, प्रसाद दुदुस्कर, पो.कॉ महेश पवार(सायबर) यांच्या पथकाने केली आहे. मा. पोलीस अधिक्षक साो श्री तुषार दोषी व मा. अप्पर पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर मॅडम यांनी वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अभिनंदन केले आहे.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sat 30th Aug 2025 01:17 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 30th Aug 2025 01:17 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 30th Aug 2025 01:17 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sat 30th Aug 2025 01:17 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sat 30th Aug 2025 01:17 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sat 30th Aug 2025 01:17 pm
संबंधित बातम्या
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sat 30th Aug 2025 01:17 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Sat 30th Aug 2025 01:17 pm
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Sat 30th Aug 2025 01:17 pm
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Sat 30th Aug 2025 01:17 pm
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Sat 30th Aug 2025 01:17 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sat 30th Aug 2025 01:17 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sat 30th Aug 2025 01:17 pm
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Sat 30th Aug 2025 01:17 pm












