आईसमोरच अल्पवयीन मुलीने बंधाऱ्यात उडी टाकून संपवले जीवन; दहिवडीत धक्कादायक घटना
Satara News Team
- Wed 11th Dec 2024 12:23 pm
- बातमी शेयर करा
दहिवडी : माण तालुक्यातील दहिवडी येथील एका नामवंत विद्यालयात इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने आईसमोरच स्वतःचे जीवन संपवले. दहिवडी- फलटण रस्त्यावरील माणगंगा नदीवरील बंधाऱ्यात उडी टाकून आत्महत्या केल्याची ही धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली आणि पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दहिवडी येथील एका नामांकित विद्यालयात ही अल्पवयीन विद्यार्थिनी इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती. मंगळवारी (ता. १०) नेहमीप्रमाणे ती शाळेत गेली; पण नंतर वर्गात दप्तर ठेवून ती बाहेर गेली. ही बाब शाळेतील शिक्षकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी विद्यार्थिनीच्या आईशी फोनवरून संपर्क साधून सांगितली. याबाबत आईने शाळेत येऊन खात्री केली असता मुलगी शाळेत आढळून आली नाही; परंतु दप्तर मात्र शाळेत मिळाले.
दप्तर घेण्यासाठी आपली मुलगी निश्चित येणार म्हणून आई शाळेतच थांबली होती. सुमारे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास आईला आपली मुलगी शाळेकडे येताना दिसली. आई आपल्याला आता ओरडेल, मारेल, या भीतीने मुलीने शाळेच्या समोरून माणगंगा नदीच्या दिशेने पळण्यास सुरुवात केली. मुलगी पुढे व आई मागे पळत दहिवडी – फलटण रस्त्यावरील माणगंगा नदीवरील बंधाऱ्याजवळ पोचल्या. यावेळी आई तिला थांब थांब म्हणत असताना मुलीने नदीवरील बंधाऱ्यात उडी मारली.
घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोचले. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने मुलीस पाण्यातून बाहेर काढले. तिला दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. घटनेची नोंद दहिवडी पोलिस ठाण्यात झाली असून, सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार बापू खांडेकर अधिक तपास करत आहेत.
#dahiwadi
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Wed 11th Dec 2024 12:23 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Wed 11th Dec 2024 12:23 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 11th Dec 2024 12:23 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 11th Dec 2024 12:23 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 11th Dec 2024 12:23 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Wed 11th Dec 2024 12:23 pm
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Wed 11th Dec 2024 12:23 pm
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Wed 11th Dec 2024 12:23 pm
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Wed 11th Dec 2024 12:23 pm
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Wed 11th Dec 2024 12:23 pm
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 11th Dec 2024 12:23 pm
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Wed 11th Dec 2024 12:23 pm
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Wed 11th Dec 2024 12:23 pm











