परराज्यातील चंदन चोरांनी सासपडे येथे घातला धुमाकूळ :बोरगाव पोलीसांचे दुर्लक्ष
राजेंद्र डांगे
- Sun 24th Dec 2023 09:08 pm
- बातमी शेयर करा
सासपडे . सासपडे ,तालूका सातारा येथील टोटराई नावाच्या शिवारात पवार कुटूंबीयांच्या विहिरीजवळ असणारे चार फुट व्यासाचे चंदनाचे झाड परराज्यातील इसमांनी तोडले.परंतू विहीर मालक पहाटेच्या सुमारास मोटर चालू करण्यासाठी गेले असता झाडांची कत्तल होत असल्याचे निदर्शनास आले.विहीर मालक श्री संदीप पवार यांनी आरडाओरड केली परंतू शिवारात शेतकरी नसल्याने कोणीही येऊ शकले नाही. याच संधीचा फायदा घेऊन या अनोळखी इसमांनी संदिप पवार यांना बेदम मारहाण केली. सदरचे इसम हे गेली दोन महिने झाले वास्तव्यास असून, हे परराज्यातील इसम हे सासपडे गावातील बेघर वस्तीमधील अनिल रमेश मोरे भंगार व्यावसायिक यांचे नातेवाईक असल्याचे दिसून येते. सदर घटनेची फिर्याद बोरगाव पोलिस ठाण्यात संदिप पवार यांनी दिली. परंतू सदर घटनेला गांभीर्याने घेतले नसल्याने सासपडे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.चंदन चोरीच्या ठिकाणी पोलिस पाटील यादव मॅडम, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री निशीकांत यादव , कोतवाल राहूल यादव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परराज्यातील , अनोळखी इसम शिवारात,गावात संशयास्पद हालचाली दिसून आल्यास कळवावे असे सांगितले. याला एक दिवस होत नाही तो पर्यंत वन्य पशू डुक्कारची शिकार करताना आढळून आली.
हे परराज्यातील इसम ज्या अनिल रमेश मोरे या भंगार व्यावसायिकाचे नातेवाईक असल्यामुळे प्रथम अनिल मोरे वर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. गावातील बरीच चंदनाची झाडे चोरीला गेली असल्याने या टोळीचा बंदोबस्त करावा.अशी मागणी ग्रामस्थांमधून पोलिस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष यांचेमार्फत पोलिसांना केली आहे.पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने ग्रामस्थ नाराज झाल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sun 24th Dec 2023 09:08 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sun 24th Dec 2023 09:08 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sun 24th Dec 2023 09:08 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sun 24th Dec 2023 09:08 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sun 24th Dec 2023 09:08 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sun 24th Dec 2023 09:08 pm
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Sun 24th Dec 2023 09:08 pm
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sun 24th Dec 2023 09:08 pm
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Sun 24th Dec 2023 09:08 pm
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Sun 24th Dec 2023 09:08 pm
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sun 24th Dec 2023 09:08 pm
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Sun 24th Dec 2023 09:08 pm
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Sun 24th Dec 2023 09:08 pm











