कोरेगावातील १८ ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी करता शशिकांत शिंदेंनी भरले 8.5 लाख रुपये

कोरेगाव  नुकत्याच राज्यात विधानसभा निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीत अचानक वाढलेली मतदानाची टक्केवारी व ईव्हीएम व्हीव्हीपॅट बद्दल महाविकास आघाडीतील नेत्यांकडून तक्रार करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांनी ईव्हीएम व्हीव्हीपॅट तपासणीची मागणी केली आहे. त्यासाठीचे शुल्क ८ लाख ४९ हजार ६०० रुपये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्यांनी भरले आहेत. ही मतदान यंत्रे सध्या साताऱ्यात असून बेल (भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड) या कंपनीचे अभियंत्यांकडून ती तपासली जाणार आहेत.ईव्हीएममधील मतांची व्हीव्हीपॅट- प्रमाणे जुळणी न झाल्यास किंवा मतांच्या प्रमाणात शंका निर्माण झाली तर पुनर्गणना केली जाऊ शकते. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये इच्छुक पक्ष किंवा उमेदवारांच्या अर्जावरून ही पुनर्गणना करू शकतात. 

त्यानुसार आ. शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात वापरलेली ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्सच्या तपासणीची मागणी अर्जाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स तपासणीसाठी संबंधित उमेदवाराला एका मशीनसाठी ४० हजार रूपये व त्यावर १८ टक्के जीएसटी भरावा लागतो. त्यानुसार आ. शशिकांत शिंदे यांनी ८ लाख ४९ हजार ६०० रूपये रक्कम २८ नोव्हेंबरला भरली आहे.

१८ ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी करता येणार… मतदारसंघात ३६५ मतदान केंद्रे होती. त्यावरील ७३० बीयू व तितक्याच सीयू तसेच व्हीव्हीपॅट मशीन त्याला जोडण्यात आला होत्या. एकूण मतदान यंत्रांच्या ५ टक्के मशीन्सची तपासणी करता येते. आ. शशिकांत शिंदे यांनी भरलेल्या रक्कमेनुसार १८ ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी करता येणार आहे. त्यामध्ये ईव्हीएमधील मेमरी चीप काढून त्यावरील मतांची तपासणी होणार आहे. त्यासाठी बेल (भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड) कंपनीच्या अभियंत्यांना बोलावले जाणार आहे. त्यापूर्वी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांच्याकडून मतदान यंत्रे तपासणीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.


कोरेगाव विधानसभा मतदारसंघात खरी लढत महायुती-शिवसेना (शिंदे गट) उमेदवार आ. महेश शिंदे आणि मविआचे – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांच्यातच झाली. या निवडणुकीत आ. महेश शिंदे यांना १ लाख ४६ हजार १६६ मते तर आ. शशिकांत शिंदे यांना १ लाख १ हजार १०३ मते मिळाली. या निवडणुकीत आ. शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. मात्र या मतदार संघातील निवडणूक प्रक्रियेबद्दल आ. शशिकांत शिंदे यांनी साशंकता व्यक्त केली आहे. त्यांनी पुन्हा मतदान यंत्रे तपासणी मागणी केल्यामुळे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला