वाईत गौण खनिजाची राजरोस लुट.... नंबर नसणारे हायवा शहरातून फिरतात -महसुल प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात
सुरेंद्र चव्हाण
- Sat 3rd May 2025 05:42 pm
- बातमी शेयर करा
वाई : कायदेशीर कारवाई आणि दंडात्मक कारवाईच्या भितीने महसूल विभागाच्या परवानगी शिवाय मुठभर गौण खनिज कोणीही उचलत नाही. मात्र हाच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी आर्थिक लागेबांधे ठेवले की राजरोसपणे, किती ही, गौण खनिजाची लुटालूट करता येते. याचा प्रत्यय वाईकरांना गेल्या काही दिवसांपासून येतोय. कोऱ्या नंबर प्लेट असलेल्या हायवा ट्रक शहरातून खचाखच गौण खनिज भरून धुरळा उडवत जात आहेत. मात्र याकडे महसूल विभागासोबत आरटीओ , पोलीसांनी सुध्दा दुर्लक्ष केल्याने ते संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
राज्यात सर्वात जास्त लाचखोर प्रकरण ही महसूल विभागाशी संबंधित उघड झाली आहेत. नेहमीच वरकमाईत माहीर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सोबत सामान्य माणसाला रोजचं यांचा प्रत्यय येतो. गेल्या काही दिवसांपासून शहरात राजरोसपणे एका पाठोपाठ एक हायवा, ट्रक खचाखच गौण खनिज भरून धुरळा उडवत वेगाने जात आहेत. सर्व हायवा,ट्रक च्या नंबर प्लेट कोऱ्या असून बड्या धेंड्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी घट्ट आर्थिक बंध असल्याशिवाय एवढे राजरोस धाडस होणार नाही.

वाई शहरात प्रांत, तहसिलदार, पोलिस उपविभागीय अधिकारी,मंडल अधिकारी यांची कार्यालये आहेत. क्षुल्लक कारणावरून आक्रमक पवित्रा घेणारे असंख्य फुटकळ सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कायद्याचा वापर करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेणारे पुष्कळ माईचे लाल आहेत. तर सर्वच राजकीय पक्षांचे बडे नेते याबाबत शांत असल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 3rd May 2025 05:42 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 3rd May 2025 05:42 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sat 3rd May 2025 05:42 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sat 3rd May 2025 05:42 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sat 3rd May 2025 05:42 pm
संबंधित बातम्या
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sat 3rd May 2025 05:42 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Sat 3rd May 2025 05:42 pm
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Sat 3rd May 2025 05:42 pm
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Sat 3rd May 2025 05:42 pm
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Sat 3rd May 2025 05:42 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sat 3rd May 2025 05:42 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sat 3rd May 2025 05:42 pm
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Sat 3rd May 2025 05:42 pm












