खुनाचा प्रयत्न करून जबरी चोरी करणारे कुख्यात गुंड लल्लन जाधव व त्याचे साथीदारांस अटक

सातारा  : सातारा शहरातील एका व्यवसायिकास मोक्का केसमध्ये जेलमध्ये असलेला दत्ता जाधव रा. प्रतापसिंहनगर सातारा याचा मुलगा लल्लन जाधव याने त्यास तुझ्यामुळे माझा बाप मोक्याचे केस मध्ये जेलमध्ये आहे. त्याला तू जबाबदार असून त्यास जेलमधून बाहेर काढण्यासाठी पाच लाख रूपयेची खंडणी मागितली. व सदरची रककम दिली नाही तर जिवंत ठेवणार नसल्याची धमकी दि. ३/०६/२०२३ रोजी दिली होती. त्यानंतर रात्रीचे सुमारास लल्लन जाधव व त्याचे अन्य साथीदारांनी त्या व्यक्तिने खंडणी न दिल्याने त्यास जीवे मारण्याचे हेतूने त्याचेवर धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. तसेच त्याचे खिशातील पैसे जबरदस्तीने काढून घेवून ते पळून गेले होते. लल्लन जाधव हा नुकताच मोक्का केस मधून जामीनावर बाहेर आला होता. त्याने त्याचे अन्य साथीदारामार्फत सदर परिसरामध्ये दहशत निर्माण केली होती. त्यास पकडणे पोलीसांसमोर आव्हान होते.
मा. पोलीस अधिक्षक सो, श्री. समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक साो, श्री. बापू बांगर, मा. पोलीस उपअधिक्षक सो, किरणकुमार सुर्यवंशी यांनी त्यास पकडणेबाबत मार्गदर्शन व सुचना केल्या. त्याप्रमाणे सातारा शहर डी. बी. पथकाने संबंधित संशयितांचा शोध करित असताना सातारा, पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्हयामध्ये विविध ठिकाणी जावून सदर संशयितांची माहिती कौशल्यपूर्वक प्राप्त केली. सदरचे संशयित हे जत तालुक्यातील एका डोंगर कपारीत आसरा घेवून राहत असलेबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. सदरचे संशयित हे अत्यंत खूनशी व सराईत असल्याने त्यांना पकडणेकरिता दोन पथक तयार करण्यात आले. सदर पथकातील काही पोलीस स्टापने विशिष्ठ वेशभूषा करून आरोपीचा ठावठिकाण्याची माहिती घेतली. परंतू सदर ठिकाणी जात असताना काळोख झालेला होता. व सदरचे ठिकाण अत्यंत निर्जन असल्याने संशयितांना चाहूल लागण्याची दाट शक्यता वाटू लागल्याने सदर पथकाने डोंगर कपारीमध्ये ठिकठिकाणी रात्रीचे थांबून त्यांचे हालचालीवर लक्ष ठेवले. संशयित हे डोंगरकपारीतून बाहेर येत असल्याची हालचाल दिसून आल्याने पोलीस स्टापने त्यांना चारही बाजूने घेरले होते. त्यावेळी सदर संशयित हे पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस स्टापने त्याना पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले. सदरचे संशयितांना डी. बी. पथकाने अत्यंत चिकाटीने व कौशल्यपूर्वक माहिती काढून ताब्यात घेतलेने वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी डी. बी. पथकाचे अभिनंदन केले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक साो, श्री. समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक साो, श्री. बापू बांगर, मा. पोलीस उपअधिक्षक सो, किरणकुमार सुर्यवंशी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. हेमंतकुमार शहा यांचे मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक श्री. सुधीर मोरे, पो.हवा. श्रीनिवास देशमुख, सुजीत भोसले, पो.ना. राहूल घाडगे, अविनाश चव्हाण, विक्रम माने, पो.कॉ. गणेश घाडगे, संतोष कचरे, सागर गायकवाड, सुशांत कदम, विशाल धुमाळ यांनी सदरची कारवाई केली आहे.

आरोपीचे नाव :- १) अजय उर्फ लल्लन दत्तात्रय जाधव वय २८ वर्षे रा. प्रतापसिंहनगर सातारा २) ऋषिकेश उर्फ डोंगुल्या नाना कांबळे वय २३ वर्षे रा. प्रतापसिंहनगर सातारा ६३) सर्जेराव उर्फ छोटया पांडूरंग कांबळे वय २० वर्षे रा. प्रतापसिंहनगर सातारा  ४) विलास उर्फ यल्या शरणाप्पा कुरमणी वय २२ वर्षे रा. वनवासवाडी सातारा

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला